Headlines

नगर शहरात लवकरच होणार अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स:पदक विजेत्या खेळाडूंचा आ. जगताप यांच्याकडून सत्कार‎




नगरचे खेळाडू विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावून अहिल्यानगरचे नावलौकिक उंचावत आहे. अशा यशस्वी खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. शहराच्या विकासाच्या बरोबरीने क्रीडा क्षेत्रही समृद्ध होणे आवशयक आहे. यासाठी सतत पाठपुरावा केल्याने राज्य सरकारकडून नगरमधील वाडिया पार्क स्टेडीयम व मैदानाच्या नूतनीकरणासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सोईसुविधांसह सरावा करता यावा यासाठी अहिल्यानगर शहरात सर्वप्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्णत्वास येत आहेत. याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले. जर्मनी येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नेवासा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले यासह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याने सुवर्ण, रौप्यपदक पटकावले. जागतिक कुस्ती संघटनेच्यावतीने थायलंड येथे झालेल्या १५ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत शेवगाव येथील पैलवान हर्षद चेमटे या खेळाडूने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी दोघांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी जिल्हा कुस्तीगिर संघाचे खजिनदार शिवाजी चव्हाण, निलेश मदने, उमेश भागानगरे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *