Headlines

Patil Slams CM Over Nashik Temple Protest; Congress Satyagraha Begins


अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची घोषणा केली असून, या आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरातून होत आहे. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश

.

पाहा काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटोज…

‘ढगफुटी’च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सपकाळ म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असली तरी आंदोलनाला मर्यादित स्वरूप देण्यात आले आहे. मात्र, आंदोलनात लोक सहभागी होऊ नयेत म्हणून ज्या भागात भारतीय हवामान विभागाने (IMD) कोणताही इशारा दिलेला नव्हता, त्या ठिकाणी ढगफुटी होणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले.

त्यांच्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होईल, असे खोटे वक्तव्य करून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न केला. “महाराष्ट्राचा सुलतान” अशी टीका करत त्यांनी फडणवीसांवर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला.

‘राम मंदिरातील देणगीवर दरोडा’

पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित केला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासनाचा कायदा करण्यात आला होता. देशातील नागरिक हा देशाचा मालक असून प्रत्येक व्यवहाराचा हिशोब जनतेसमोर असला पाहिजे, असे ते म्हणाले.

मात्र, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना राम मंदिर ट्रस्टमध्ये स्थान देऊन मंदिरातील देणग्यांवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रामभक्तांनी दिलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा, रोख देणग्यांचा आणि इतर मालमत्तेचा संपूर्ण हिशोब जनतेसमोर यावा, अशी मागणी त्यांनी केली.

‘एसआयटी चौकशीवर विश्वास नाही’

राम मंदिर प्रकरणाच्या चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष तपास पथकावर (SIT)ही सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एसआयटीमधील काही अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मते, या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून जनतेला त्याचा संपूर्ण हिशोब मिळालाच पाहिजे.

‘बुलडोझर न्याय’चा मुद्दाही उपस्थित

सपकाळ यांनी भाजपवर दुहेरी निकषांचा आरोपही केला. दलित, आदिवासी किंवा अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींवर गुन्ह्याचा आरोप झाला की त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवला जातो. मग राम मंदिरातील कथित गैरव्यवहारातील आरोपींवरही अशीच कारवाई होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आज काळाराम मंदिरातून आंदोलनाची सुरुवात

काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची सुरुवात आज सकाळी ११ वाजता नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातून झाली आहे. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश ऊर्फ बबलू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर तसेच शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

9 ते 14 जुलैदरम्यान राज्यभर सत्याग्रह

काँग्रेसने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 9 ते 14 जुलै या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राम मंदिर, शिव मंदिर किंवा हनुमान मंदिरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान “मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या भाजपा आणि आरएसएसच्या लोकांना सुबुद्धी दे,” अशी प्रार्थना करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर काँग्रेसची आक्रमक भूमिका

राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा’ आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आता काँग्रेसनेही हा मुद्दा आक्रमकपणे उचलला आहे. रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित देणग्यांचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी वाचा

देशात मोदी अन् फडणवीसांचे बिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘विकासपुरुष’ नरेंद्र मोदी आणि ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे बिंगआता पूर्णपणे फुटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी

हल्लाबोल:’अजितदादांच्या अपघातातील कंपनीलाच कंत्राट?’, चौकशीची मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अ‍ॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आल्याचे सांगत, “अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात ज्या कंपनीचे नाव समोर आले होते, त्याच्याशी संबंध असलेल्या कंपनीलाच मिसिंग लिंकचे कंत्राट देण्यात आले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.