![]()
नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियंत्रण सुटले, भरधाव कारने उडवले प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून जात असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. कारचा वेग प्रचंड असल्याने 8 ते 10 जणांना अत्यंत तीव्र धडक बसली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की अनेक जण हवेत फेकले गेले. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चालक गाडी सोडून पळाला अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळीच वाहन सोडून पळ काढला. पोलिसांच्या भीतीने तो फरार झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार ताब्यात घेण्यात आली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. पोलिसांचा तपास सुरू या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. वाहनाचा वेग, चालकाची निष्काळजीपणा, तसेच मद्यप्राशन किंवा अन्य कारणांचा तपास केला जात आहे. फरार चालकाला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक घटना मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच नवी मुंबईतील हा भीषण अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेमुळे तळोजा परिसरात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
Source link
नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार