Headlines

Oil companies earn Rs 11 per liter; No relief for common man, crude at $68.69/barrel; Companies have been in profit for 36 consecutive days


  • Marathi News
  • National
  • Oil Companies Earn Rs 11 Per Liter; No Relief For Common Man, Crude At $68.69 Barrel; Companies Have Been In Profit For 36 Consecutive Days

गुरुदत्त तिवारी | मुंबई5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका-इराण युद्धादरम्यान विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या कच्च्या तेलाचे दर आता ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. इंडियन बास्केटमधील कच्चे तेल ६८.६९ डॉलर/बॅरलवर आले आहे. युद्धादरम्यान गाठलेल्या १५७ डॉलरच्या सर्वोच्च पातळीपेक्षा हे सुमारे ५६% कमी आहे. असे असूनही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही.

डीएएम कॅपिटलच्या मते, सध्याच्या किमतीनुसार तेल कंपन्या पेट्रोलवर १०.५ आणि डिझेलवर प्रतिलिटर ११ रुपयांपर्यंत मार्जिन कमवत आहेत. १ जूननंतर कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलरच्या खाली आहेत. या दरावर तेल कंपन्या ब्रेक इव्हन (ना नफा, ना तोटा) स्थितीत राहतात. म्हणजेच कंपन्या सलग ३६ दिवसांपासून नफ्यातच आहेत.

कच्च्या तेलाचे दर ८ एप्रिलनंतर ११५ डॉलरखाली

८ एप्रिलला पहिला युद्धविराम लागू झाल्यानंतर अनिर्बंध वाढीचा काळ थांबला. यानंतर कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरच्या खाली राहिले. सर्वाधिक वाढीच्या दिवसांत कंपन्यांचे चौथ्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च २०२६) निकाल नकारात्मक नव्हते.

देशातील ४ मोठ्या कंपन्यांचा नफा जास्त

देशातील चार मोठ्या तेल कंपन्यांचा नफा गेल्या वर्षीच्या २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २२% जास्त राहिला. युद्धाचे ३३ दिवस या तिमाहीत होते. इंडियन बास्केटमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल १५७ डॉलरपर्यंत होते. मार्चमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल १२५.७ डॉलर, नंतर ६० दिवसांत कच्च्या तेलाचे दर प्रती बॅरल १११ डॉलर राहिले.

कच्चे तेल ७५ डॉलर असो वा १२०, पेट्रोलचे दर सारखेच

२०१८ मध्ये कच्च्या तेलाचे दर ८०.०८ डॉलर/बॅरल होते तेव्हा दिल्लीत पेट्रोल ७२.१५ रु. आणि डिझेल ७०.२१ रु. प्रति लिटर होते. २०२० मध्ये कच्चे तेल ४३.४१ डॉलर/बॅरल झाले. पण पेट्रोल ६८.२० रु./लिटरच राहिले. २०२२ मध्ये कच्च्या तेलाचे दर ११९ डॉलर/बॅरलपर्यंत पोहोचले. तेव्हा पेट्रोल ९६.७२ रु./लिटर आणि डिझेल ८९.६२ रु./लिटर झाले. जानेवारी २०२३ मध्ये कच्च्या तेलाचे दर ७५ डॉलरपर्यंत पोहोचले. पण दर जैसे थे राहिले. सध्या जुन्या तोट्याची भरपाई होत आहे, असा तेल कंपन्यांचा युक्तिवाद होता.

भास्कर एक्स्पर्ट मनोरंजन शर्मा, चीफ इकॉनॉमिस्ट, इन्फोमेरिट रेटिंग्ज

कंपन्यांना जनतेपेक्षा बॅलन्स शीटची चिंता, राज्ये आणि केंद्र कर वाढवून आपली कमाई वाढवतील

देशात पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करताना सर्वसामान्यांच्या खिशापेक्षा कंपन्यांच्या बॅलन्स शीटचा जास्त विचार केला जातो. तेल कंपन्या व सरकार सोयीनुसार दरांची पातळी ठरवतात. सध्या कच्च्या तेलाचे दर ६८.६९ डॉलर/बॅरल आहेत. तर दिल्लीत पेट्रोल १०२.१२ व डिझेल ९५.२० रुपये लिटर आहे. २०२२ मध्ये युक्रेन युद्धावेळी पेट्रोल ९५.४७ व डिझेल ८६.६७ रु. लिटर होते. या काळात बहुतांश वेळ कच्च्या तेलाचे दर ६०-७० डॉलरच्या दरम्यान राहिले. पण, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत फरक पडला नाही. सरकारला वाटते की, जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरांची सवय झाली. दर खाली येतील तेव्हा राज्य व केंद्र कर वाढवून कमाई करतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *