![]()
काही महिन्यांपूर्वी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.हे दुःख ताजे असतानाच नातवाचाही अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच आजीनेही क्षणात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमके प्रकरण काय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री दुचाकी कठड्याला धडकून पुलाखाली कोसळल्याने राजू ज्योतीराम सूर्यवंशी (वय २८) याचा जागीच मृत्यू झाला. राजूच्या अपघाती मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळताच त्याच्या आजीला हा मोठा धक्का सहन झाला नाही. काही महिन्यांपूर्वीच मुलाचे निधन झाले होते आणि आता नातवाचाही मृत्यू झाल्याने दुःखाचा आघात सहन न झाल्याने आजीनेही प्राण सोडल्याचे सांगण्यात येत आहे. आजी-नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार या हृदयद्रावक घटनेनंतर शुक्रवारी राजूच्या मूळ गावी यशवंतवाडी (ता. रेणापूर) येथे आजी आणि नातवावर एकाच ठिकाणी, एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना काही महिन्यांच्या अंतराने काळाने हिरावून नेल्याने अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.या दुर्दैवी घटनेने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने यशवंतवाडी तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Source link
नातवाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच आजीनेही सोडला प्राण:काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचे निधन