![]()
येथील विकासनगर भागातील विविध विकास कामांच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून विकास कामांचे आश्वासन दिले.
.
मविसे अकलूज शहर युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले व विकासनगर मधील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पाणी प्रश्न सोडवणे, विकासनगर मध्ये नवीन बोअरवेल घेऊन पाणी प्रश्न सोडविण्यात यावा. प्रवेशद्वार व समाज मंदिर, मुख्य रस्त्यावर साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार कमान व समाज मंदिर बांधण्यात यावे. सार्वजनिक शौचालय, परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे. या आंदोलनावेळी युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, अध्यक्ष आदित्य काकडे, बिभीषण साठे, सरचिटणीस सतीश साठे, बापूसाहेब वाघमारे, बाळू खिलारे यांच्यासह विकास नगर मधील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी सर्व विषय सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निधी उपलब्धतेनुसार काम करण्यात येईल, तसेच अतिक्रमण नियमाकुल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घरकुलचा लाभ देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे