Headlines

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका




गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत अनेक नियमित आणि विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रतिकूल हवामान आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले, तरी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत. रेल्वेचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथके 24 तास राबत असून रेल्वेचे तिन्ही मार्ग लवकरात लवकर सुरक्षित करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन ऐन पावसाळ्यात प्रवाशांचा मनस्ताप टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी गाडीच्या वेळेची आणि सद्यस्थितीची खात्री करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक, NTES (National Train Enquiry System) ॲप किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरील अपडेट्स पाहावेत, जेणेकरून प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टळेल. दिनांक 10 जुलै ते 17 जुलै कालावधीत दररोज धावणाऱ्या खालील गाड्या रद्द वेगवेगळ्या तारखांना सुटणाऱ्या या गाड्या रद्द या विशेष गाड्या रद्द



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *