![]()
उचलीचे 50 हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याला 4 दिवस डांबून ठेवले. या काळात त्याला बेदम मारहाण करुन छळ केला. तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला नाही, असा आरोप आहे. देविदास कापसे(रा.उमापूर, ता.गेवराई) असे मारहाण झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे, तर अपहरणाची दुसरी घटना मांजरसुंबा घाटात घडली. संशयितांनी तरुणासह त्याच्या वडिलांचे अपहरण केले. त्यांना 2 दिवस डांबून 1.80 लाखांची खंडणी उकळली. गणेश दरम्यान, थोरात (रा. खांडवी, ता. गेवराई) या मुकादमाकडून कापसे यांनी 2 लाख रुपयांची उचल घेतली होती. यातील दीड लाख रुपये त्यांनी फेडले होते, तर 50 हजार रुपये बाकी होते. यातून 2 जुलै रोजी देविदास हे दोन मित्रांसह गेवराईला गेले असताना बेलगाव फाट्यावरून त्यांचे मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केले.त्यानंतर त्यांना कर्नाटकातील कारखान्यात नेण्यात आले.तिथून पुन्हा पुणे जिल्ह्यातील घोडनदी शिरुरमध्ये नेले. तिथे शेडमध्ये दोन दिवस डांबून लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तोंडात लघुशंका करून छळ केला. तक्रार दिली नाही- पवार या प्रकरणात पिडीत मजुराचे आई,भाऊ आले होते. आमच्या अंमलदारांनी योग्य ती चौकशी केली व स्टेशन डायरीला नोंद घेतली. मी असताना नातेवाईक आले. त्यांना तक्रार देण्यास सांगितली होती मात्र त्यांनी सरपंच व इतर व्यक्तींच्या मार्फत ठाण्याच्या बाहेरच प्रकरण आपसात मिटवून घेतले. तक्रार नसल्याने गुन्हा नोंद नाही.असे, गेवराईचे पीआय किशोर पवार म्हणाले. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला मी ओळखतो मी गेवराईहून 2 मित्रांसह जाताना कार थांबली. त्यातील लोकांनी काही कळण्याच्या अपहरण करून कर्नाटकात नेले. तिथे मला गाडीतच ठेवून कारखान्याच्या लोकांशी चर्चा केली. नंतर घोड नदी शिरूर परिसरात नेऊन मारहाण केली. माझ्या तोंडात लघुशंका केली. मी फक्त गणेश थोरातला ओळखतो इतरांना नाही. 0देविदास कापसे, ऊसतोड मजूर मुलासह वडील अपहरण प्रकरणी 6 जणांवर नेकनूर पोलिसांत गुन्हा बीड | सोलापूर-धुळे हायवेवरील मांजरसुंबा घाटात कारला जीप आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवत दोघांचे अपहरण केले. नंतर 2 दिवस डांबून ठेवून रोख रक्कम, सोन्याची अंगठी अशी 1 लाख 80 हजाराची खंडणी उकळली. या प्रकरणी 6 जणांवर नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद केला. श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (50, रा. पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर; मूळ रा. वालवड, ता. भूम) हे 3 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कारने मानलेले वडील विजयसिंह रणनवरे आणि मानलेली आत्या सुवर्ण मालारणनवरे यांच्यासह वालवड (ता. भूम) येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. बीड तालुक्यात मांजरसुंबा घाटात पाठीमागून आलेल्या एका जीपने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून आडवे लावले. वाहनातील उदयसिंह ऊर्फ सोनू सत्यजितसिंह जाधव (रा. गणेगाव, ता. भूम, जि.धाराशिव), अझर सय्यद (रा. बेलगाव पिंपळगाव, ता. भूम,जि. धाराशिव), निखिल (पूर्ण नाव माहीत नाही, रा.बेलगाव पिंपळगाव, ता. भूम), राहुल काळे (रा. भूम, जि.धाराशिव) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना उतरण्यास सांगून अपहरण केले.
Source link
ऊसतोड मजुराचे अपहरण; चार दिवस छळ, तोंडात लघुशंका करून मारहाण:जखमी मजुरावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू