Headlines

सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली:तुम्ही अवमान तरी करू नका, सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी मंत्र्यांनाच सुनावले




स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी मंत्री जयकुमार रावल यांना या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. तसेच, या प्रलंबित विषयाकडे सरकारचे तातडीने लक्ष वेधून घेत सावरकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची शिफारस करणारा ठराव लवकरात लवकर विधिमंडळात मांडण्यात यावा, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्याची मागणी मी केली होती. केंद्र सरकारकडे अशी शिफारस करू, असे मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटले होते. मात्र कामकाज पत्रिकेत याबाबतचा कोणताही उल्लेख नाही. सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली आता आपण अवमान करू नये, असे खडेबोल मुनगंटीवार यांनी मंत्र्यांना सुनावले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न देण्याचे ठरले होते. संसदीय कार्यमंत्र्यांना आठवण करून देतो की सत्ता आल्यावर असे विसरून जाणे योग्य नाही. आता पुन्हा हे सभागृहात मांडणार नाही. फाईलला इतकी यातना का होत आहे? ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सावरकरांच्या विचारांवर जगलो, पण आता आपले सरकार अश्या पद्धतीने फाईल दाबून ठेवत असेल तर हे योग्य नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, सावरकर यांना भारतरत्न देरण्याचा प्रस्ताव हा चर्चेतून यावा म्हणून आज हा प्रस्ताव आणला नाही. पुढील अधिवेशनात प्रस्ताव आणला जाईल, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *