Headlines

ॲप्रोच चॅनल तयार करण्यासाठी धरणात ब्लास्टिंग करावे लागणार:रोज 5 कोटी लिटर पाणी वाढले; मात्र ॲप्रोच चॅनलचे काम 4 महिने रखडले



महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार यांच्यातील वादामुळे १६ दिवसांपासून बंद असलेला नवीन पाणीपुरवठा अखेर सुरू झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेल्या ताकिदीनंत

.

नक्षत्रवाडी पंपहाऊसला पावसामुळे लागलेली गळती आणि मुख्य जलवाहिनीवरील ५३ नादुरुस्त व्हॉल्व्हचे कारण देत एमजेपीने २४ जूनपासून जायकवाडीतून पंपिंग बंद ठेवले होते. जोपर्यंत व्हॉल्व्ह दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत पंपिंग करणार नाही, अशी प्राधिकरणाची ताठर भूमिका होती. मात्र, जीव्हीपीआर कंपनीने पंपिंग केल्यास व्हॉल्व्हचा अडसर येणार नाही, असे सांगत जबाबदारी स्वीकारली. तरीही प्राधिकरण ऐकण्याच्यास्थितीत नव्हते. गुरुवारी आयुक्त येडगे यांनी मनपा, एमजेपी आणि जीव्हीपीआरच्या अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक घेत कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी पंपिंग सुरू करण्याचे सक्त आदेश दिले.

चुका अंगलट येण्याच्या भीतीने एमजेपीचा होता नकार

एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात कंत्राटदाराने केलेल्या चुकांचा पाढाच वाचला होता. या सर्व चुका अंगलट येऊ शकतात, या भीतीने सर्व त्रुटी दुरुस्त करूनच योजना सुरू करण्यावर एमजेपी आग्रही होते. याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसत असल्याने मनपाने पाणी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर कंत्राटदाराकडून व्हॉल्व्ह आणि अन्य बाबी बदलून देण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. मात्र, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले का हा प्रश्न अद्याप कायम आहे.

कॉफर डॅमच्या संरक्षक भिंतीला धोका होऊ शकतो

ॲप्रोच चॅनलसाठी धरणात ब्लास्टिंग करावे लागेल, ज्यामुळे कॉफर डॅमच्या संरक्षक भिंतीला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे जोपर्यंत जॅकवेलवरील पीईबी स्ट्रक्चरचे काम पूर्ण होत नाही आणि जॅकवेलमधील पाणी उपसले जात नाही, तोपर्यंत चॅनलचे काम करता येणार नाही. यासाठी किमान ४ महिन्यांचा कालावधी लागेल. सद्य:स्थितीत ४४५ मी.पर्यंत काम झाले तरी शहराला पुरेसे पाणी मिळेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्लॅबच्या गळतीमुळे पुरवठा बंद

स्लॅब गळतीमुळे पुरवठा बंद करण्यात आला होता. आता ती गळती बंद झाली असून पाणीपुरवठा सुरू करण्यास कोणतीही अडचण नव्हती. याबाबत कंत्राटदाराने हमीपत्र लिहून दिले आहे. त्यामुळे नवीन योजनेतून पाणी घेणे सुरू करण्यात आले आहे. – अमोल येडगे, मनपा आयुक्त.

जुन्या जलवाहिन्यांतून पाण्याचे नियोजन होणार

या आदेशानंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पंपिंग सुरू करण्यात आले आणि शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हे पाणी नक्षत्रवाडीत आले. नवीन जॅकवेल आणि जलशुद्धीकरण केंद्रातून उपसा सुरू केल्याने ५० एमएलडी वाढीव पाणी प्राप्त झाले. हे पाणी मिळताच आयुक्तांनी अस्तित्वात असलेल्या जुन्या जलवाहिन्या आणि जलकुंभांच्या माध्यमातून या पाण्याचे योग्य नियोजन करून त्वरित वितरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *