![]()
अकोला सध्या अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पुढील आठ ते दहा दिवस दमदार पावसाची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन””मुळे (चक्रीवादळ सदृश स्थिती) मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलली आहे. हे बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दक्षिणेकडे म्हणजेच श्रीलंकेकडे वळले आहेत. तसेच, गुजरात, राजस्थानमधील अधिक तापमानामुळे काही वारे तिकडे खेचले गेले आहेत. त्यामुळे मान्सूनचा सर्वत्र पडणारा सलग पाऊस सध्या थांबला असून, १० दिवसांनंतरच पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्याची हवामान स्थिती पाहता मान्सूनची ट्रफ लाईन (पावसाचा पट्टा) विस्कळीत झाली आहे. ही स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणि हिंदी महासागरातील वाऱ्यांची दिशा पुन्हा भारताकडे वळण्यासाठी किमान ८ ते १० दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे १० दिवसांनंतरच जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची आणि पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे उर्वरित जुलै आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होणे गरजेचे आहे.चालू हंगामात सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ आणि आता पडलेला हा मोठा खंड पाहता, शेतीचे गणित पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. २. पाणी अडवणे आणि जिरवणे: नद्या आणि नाल्यांवर दर ४ ते ५ किलोमीटर अंतरावर पाणी अडवण्याची व साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. १. तलाव उभारणी: जुन्या काळातील गावोगावी छोटे तलाव आणि जलसंधारणाचे जाळे निर्माण करण्याची तातडीची गरज आहे. ‘एक गाव, एक तळे”” अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. {हिंदी महासागरात तापमानवाढीने चक्रीवादळामुळे देशात येणारे मान्सूनचे वारे कन्याकुमारी आणि श्रीलंकेकडे वळले आहेत. त्यामुळे मान्सूनचा जोर ओसरला आहे. विदर्भातील मान्सूनचा पाऊस बंद झाला असून मुंबई व समुद्र किनारपट्टी भागातील पाऊसही आता थांबणार आहे. आता बाष्पयुक्त वाऱ्यांऐवजी कोरडे वारे वाहत आहेत. {गुजरात व राजस्थानकडे उष्ण तापमानामुळे वारे खेचले गेले. येथे थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंद महासागरातील सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव कमी झाल्यानंतर अकोल्यासह महाराष्ट्रात पुन्हा मान्सून परतण्याची शक्यता आहे. विदर्भातील तापमान वाढल्यानंतर मान्सूनचे वारे इकडे खेचले जातील व १० दिवसांनंतर पुन्हा पावसाला सुरूवात होईल. भविष्यातील पाणीटंचाई आणि तापमानाच्या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हाच सर्वात सोपा उपाय आहे. विदर्भातील उष्ण पट्ट्यात पाण्याची गरज वाढणार असल्याने खालील प्रयोग राबवणे आवश्यक आहेत. ३. नदी काठावर वृक्षारोपण: नद्या आणि नाल्यांच्या काठावर वड आणि इतर पारंपारिक जंगलातील झाडे लावणे आवश्यक आहे, जेणेकरून भूजल पातळी नैसर्गिकरीत्या वाढेल. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. एल निनोचा प्रभाव, पावसाचे चक्र बिघडले एल निनोमुळे तापमानात वाढ होत असून, हवामान, पावसाचे संपूर्ण चक्रच बिघडले आहे. यावर्षी पावसाचे एकूण प्रमाण थोडे कमी (९० टक्क्यांपर्यंत) राहण्याची शक्यता असली तरी, पावसाळ्याचा कालावधी ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची चिन्ह आहेत. पावसाचे स्वरूप बदलल्याने जेव्हा पाऊस येतो, तेव्हा तो अचानक व मुसळधार स्वरूपात येतो. पाणी साठवण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. जलसंधारण व वृक्षारोपण हाच पर्याय, विदर्भात उष्ण पट्टा शेतीवर गंभीर परिणाम पावसाची दिशा बदलल्यामुळे व सलग खंड पडल्यामुळे शेतीवर गंभीर परिणाम होत आहेत. १. पेरणी रखडली: पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक ठिकाणी अद्याप योग्य प्रकारे पेरणी झालेली नाही. २. पाण्याची टंचाई व असमान वितरण: पिकांसाठी पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. जेथे पाऊस पडला तेथे तो खूप मोठ्या प्रमाणावर पडला आणि वाहून गेला, तर इतर भाग कोरडेच राहिले. ३. सिंचनाची गैरसोय: पाणी साठवण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने सुरुवातीच्या पावसाचे पाणी साठवता आले नाही. जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत १७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परंतु गतवर्षी ११ जुलैपर्यंत २२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी ८२.४ टक्के आहे तर गतवर्षी ११ जुलैपर्यंत १०३.७ टक्के पाऊस झाला होता. म्हणजेच टक्केवारीतही ३१.३ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे. याचा परिणाम शेतीसह भूजलसाठ्यावरही झाला आहे. तसेच धरणांमधील जलसाठा अजूनपर्यंत वाढलेला नाही. त्यामुळे मुसळधार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील प्रकल्प भरले नाहीत तर अकोला शहरासह इतर शहरे व गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते.
Source link
अकोल्यात पावसाची प्रतीक्षा कायम:दहा दिवसांनंतरच आगमनाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत 46 मिमी कमी पाऊस; जिल्ह्यातील धरणे अजुनही तहानलेली