![]()
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या मूळ बाधितांनी कोणालाही सहजपणे जागा विक्री अधिकार देऊ नयेत. पुनर्वसनातून सर्वाधिक आर्थिक व सामाजिक लाभ मूळ नागरिकांनाच मिळाला पाहिजे, यासाठी आग्रह राहील, असे शिवसेना नेत्या तथा माजी उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्
.
या बैठकीत २२ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र, घर व दुकान जागेच्या बदल्यात नेमका कोणता मोबदला मिळणार, त्याचे स्वरूप काय असेल याची जमीनमालकांना अधिकृतपणे माहिती मिळावी. ४८६ बाधितांपैकी केवळ १५ जणांनी प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला तर १० जण तटस्थ राहिले. उर्वरित बाधितांनी कॉरिडॉरला विरोध दर्शविला होता. बैठकीस पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर, वैभव बडवे, पत्रकार सुनील उंबरे यांच्यासह अनेक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. बाधित कुटुंबांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या राहत्या घराशी निगडित व धार्मिक व्यवसायावर आणि व्यापारावर अवलंबून असल्याचे नमूद करत, केवळ घराच्या बदल्यात घर किंवा दुकान देणे पुरेसे ठरणार नाही. पुनर्वसनासोबत त्यांच्या रोजगार आणि उपजीविकेचा ही प्रश्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.