![]()
आमिर खानचा तिसरा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या लोकांकडे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का? ही चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. हिंदू समाज बांधवांनी सावधान रहावे, असे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर कुठेही दिसले तर यांचे चित्रपट पाहायचे का हे देखील ठरवायला हवे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. नीतेश राणे म्हणाले की, मशिदीमध्ये ज्या ज्या वेळी आर्थिक घोटाळे झाले त्यावेळी हज यात्रेबद्दल अनेक तक्रारी आल्या त्यावेळी यांना मशिदीबाहेर जात इस्लाम रक्षा किंवा कुराण वाचावे असे या लोकांना वाटले नाही. हिंदू धर्माची बदनामी करण्याची कुठलीही संधी ही औरंगजेबाची पिलावळ कधीच सोडणार नाही. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी या पिलावळीला मिळाली आहे. जेवढी हिंमत हे आमच्या हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी दाखवतात, तेवढीच हिंमत हज यात्रेमध्ये जे काही चुकीचे प्रकार होतात, याविरोधात दाखवले पाहिजे. मशिदींमधील घोटाळ्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा नीतेश राणे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये जी बाबरी मशिद बनते आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दान पेट्याच्या संदर्भातील एक मोठा घोटाळा घडला त्यासंदर्भात बोलण्याची कोणीही हिंमत केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्याची मस्ती हे लोकं दाखवतात. कधीतरी इमाम आणि मौलवीसमोर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखवावी. शेतकऱ्यांचा खरे तारणहार फडणवीस शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.ज्या जाचक अटी होत्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या आमच्या देवाभाऊंच्या सरकारने दूर केल्या आहे. काही नेत्यांनी स्वत्:ला शेतकरी नेते, महर्षी म्हणून घेत आयुष्य घालवले त्यांना जे जमले नाही ते देवाभाऊंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून करुण दाखवले आहे. आज शेतकऱ्यांचा खरा तारणहार देवेंद्र फडणवीस आहे हे त्यांतून दिसून येते. राऊतांचे नेते सरपंच सुद्धा होऊ शकत नाही नीतेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्या पक्षाचे नेते आता सरपंच सुद्धा होऊ शकत नाही अशी चिन्ह दिसत आहे.त्यांच्या पक्षात एकही पदाधिकारी, आमदार, खासदार राहायला तयार नाही. राऊत काड्या लावण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही. त्यांनी ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीमध्ये काड्या लावल्या आणि आता ते भाजपमध्ये काड्या लावत आहेत. आम्ही राष्ट्रप्रथम म्हणून काम करणारे लोकं आहोत आम्हाला पद महत्वाचे मानत नाही. पण हे राऊत यांनी लक्षात येणार नाही. या वर्षी पावसाची परिस्थिती तशी गंभीर आहे. साई बाबांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहत त्यांना आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना मी केली आहे.
Source link
आमिर खानकडे लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का?:आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून नीतेश राणेंचा घणाघात