Headlines

स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा दावा खोटा:‘कॅमेरा’ची अफवा पसरवणाऱ्या ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकावर गुन्हा दाखल




महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा धादांत खोटा आरोप करून सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर आणि ‘कोकणसाद’ यूट्यूब चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात रविवारी (12 जुलै) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावंतवाडी येथे 10 जुलै रोजी ‘कोकणसाद’ यूट्यूब चॅनेलवर स्मार्ट मीटर संदर्भात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ यांनी स्मार्ट मीटरचे फायदे सांगून सर्व शंकांचे निरसन केले होते. या चर्चेदरम्यान नंदन वेंगुर्लेकर यांनी “स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असून त्याद्वारे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे” असा अत्यंत हास्यास्पद आणि खोटा दावा केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण दिले होते, तरीही: ‘कोकणसाद’ चॅनेलने महावितरणचा खुलासा वगळून केवळ दिशाभूल करणारा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ ‘स्मार्ट मीटरची चिरफाड’ या मथळ्याखाली रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसारित केला. सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि बदनामी करण्याच्या हेतूने ही खोटी माहिती पसरवण्यात आली. महावितरणने या गंभीर प्रकाराची दखल घेत सावंतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353 (1) (बी): जनतेत भीती निर्माण करून गुन्ह्यास चिथावणी देणे, 351 (3) कलम 351 (3): गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, कलम 352 आणि 356: शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान आणि बदनामी करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचा महत्त्वाचा खुलासा स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात कोणताही ‘कॅमेरा’ किंवा गोपनीयता भंग करणारी यंत्रणा नाही. वीजग्राहकांनी अशा कोणत्याही खोट्या व काल्पनिक माहितीला बळी पडू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर यापुढेही कडक फौजदारी कारवाई केली जाईल.— महावितरण प्रशासन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *