![]()
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती आणि न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल, बालाजी नगर, मोतीनगर वॉर्ड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका जयश्री आसलकर, सहायक अधीक्षक, न्यायपरिरक्षक कार्यालय, अमरावती येथील ॲड. प्रीती मोहता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयंसेवक मोना खोब्रागडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. प्रीती मोहता व मोना खोब्रागडे यांनी विविध कायदे, संविधानिक हक्क, कर्तव्ये आणि बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच भारतीय संविधानातील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने नागरिकांना विविध अधिकार दिले असले तरी त्या अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण (नालसा) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस फॉर चिल्ड्रेन योजना-२०२४’ विषयी माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत मुलांना उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर सेवा, बालहक्क, न्याय मिळविण्याची प्रक्रिया तसेच गरजू आणि वंचित मुलांना दिल्या जाणाऱ्या कायदेशीर मदतची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. अन्याय, शोषण किंवा अत्याचाराचा सामना करावा लागल्यास भीती न बाळगता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात पोस्को (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक) कायदा यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच व बॅड टच, वैयक्तिक सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि लैंगिक छळ अथवा अत्याचाराच्या घटनांमध्ये त्वरित पालक, शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास, त्यांच्या हक्कांविषयी जाणीव वाढविण्यास तसेच सुरक्षित, जबाबदार आणि सुजाण नागरिक घडविण्यास उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच नालसा अंतर्गत बालकांना उपलब्ध मोफत विधी सेवा आणि बालहक्कांची माहिती देण्यात आली. पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, वैयक्तिक सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा छळ, अत्याचार किंवा अन्याय झाल्यास संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
Source link
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम:बालसुरक्षा, सायबर सुरक्षा अन् कायदेविषयक जागृती अभियान