![]()
शेतमजूर महिलेला पोह्यांमध्ये गुंगीची औषध टाकून त्याच्यावर अत्याचार केला. याचा व्हिडिओ काढून वर्षभर शोषण केल्याची तक्रार जामनेर तालुक्यातील एका गावातील महिलेने फत्तेपूर पोलिस ठाण्यात दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आदिवासी असून शेतमजूर म्हणून काम करते. शेतात कामाला गेली असता रामेश्वर गणपत राठोड याने त्याच्या डब्यातील पोह्यांमध्ये गुंगीचे औषध टाकून पीडित महिलेला खाऊ घातले. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ दाखवून रामेश्वर व त्याच्या मित्रांनी वर्षभरात अनेक वेळा अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली. यावरून रामेश्वर राठोड, सुरज भिमसिंग राठोड, पवन छगन राठोड, भारमल कृपाल साबळे, यांचे सह तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल केल्याने गुन्हा दाखल पीडित महिला बुधवारी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेली. मात्र सदर महिलेची तक्रार घेण्यात आली नाही. म्हणून सदर महिलेने रात्री बारा वाजे दरम्यान फत्तेपूर पोलिस तक्रार घेत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर तक्रार घेण्यात आल्याची माहिती पीडितेने दिली. संभाजीनगरात पीएसआयकडून शिक्षिकेवर अत्याचार दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत ग्रेड पीएसआय हरीश माधवराव खटावकर (53) याने खासगी शाळेतील शिक्षिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खटावकर याची पीडितेशी 4 वर्षांपूर्वीची ओळख होती. त्याने मे 2025 ते 15 जुलै 2026 या काळात हॉटेलमध्ये काम असल्याचे सांगून तसेच घराचे इंटेरिअर बघण्याच्या बहाण्याने बोलावून पीडितेवर अत्याचार केला. नकार दिल्यास पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी तो देत होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच खटावकर पसार झाला आहे. उपायुक्त कार्यालयाने सविस्तर अहवाल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना पाठवला असून, त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. पतीने जाब विचारताच राडा खटावकर पत्नीला मेसेज करत असल्याचे समजताच पतीने त्याला जाब विचारला.तेव्हा ‘माझे तिच्यावर प्रेम आहे,’ असे सांगून त्याने फोन कट केला. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तो पीडितेच्या घरी पोहोचला. पतीने तिला घराबाहेर काढले. त्यानंतर खटावकरने तिला कारमध्ये बसवून मारहाण केली. सय्यद निसार ही कार चालवत होता. रात्री 10 वाजता तिचा मोबाइल हिसकावून घेत खटावकरने तिला दूध डेअरी चौकात उतरवून दिले आणि तो निघून गेला.
Source link
जळगाव हादरले:शेतमजूर आदिवासी महिलेला पोह्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडिओ काढून वर्षभर शोषण, जामनेर तालुक्यातील घटना