Headlines

'वर्षा' बंगल्यावर जयंत पाटलांना भेटलो नाही:राष्ट्रवादीला अर्थखातं हवं; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार- सुनील तटकरे




जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा करतो, रवी राणा मोठे नेते आहेत मी छोटा माणूस आहे त्याच्यावर बोलू शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळावे ही आमची मागणी आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी करणार आहोत. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यामध्ये काही वेगळे राजकारण असेल असे मला वाटत नाही. जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत, ते 7 वेळा विधीमंडळात निवडून आले आहेत, ते वेगवेगळ्या कामांसदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, त्यांच्या पक्षाची वाटचाल करण्याचा त्यांना अधिकार आहे. पवारांनी कोणासोबत जावे हा त्यांचा निर्णय सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या सत्तेतील सहभागाच्या काय चर्चा आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. शरद पवारांची गेली 60 वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. युपीएला ताकद देण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जावे हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत नाही सुनील तटकरे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद मी ऐकली त्या म्हणाल्या की उद्या जर का डिलिमिटेशन बिल 33 टक्के महिला आरक्षणासहित आले तर महिलाच्या जागा वाढवल्या महाराष्ट्रातील मतदारसंघाची संख्या वाढवली तर आम्ही विचार करत युपीएमध्ये चर्चा करू असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी वर्षा बंगल्यावर जाण्याची काय गरज आहे? अजित पवारांच्या निधनापूर्वी विलीनीकरणाची चर्चा झाली होती. दादांचे निधन झाले नसते तर 15 फेब्रुवारीच्या तारखेला विलीनीकरण होऊ शकले असते. पण आता सुप्रिया सुळेंनी तो मुद्दा संपला असून पक्ष बांधणीचे काम करतो असे म्हटले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यात कुठेही चर्चेत नाही. ही चर्चा बंद झाल्याचे त्यांच्या पक्षाने सांगितले आहे. पुढे काही आले तर तेव्हा बोलूयात. आता राजकीय समीकरण बदलले सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी या संदर्भातील चर्चा पूर्ण केल्या होत्या.त्या जर अखेरच्या टप्प्यात आल्या असत्या तर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली असती. चर्चा सुरू आहे याबद्दल त्यांनी मला माहिती होती. पण आता सर्व समीकरण बदलले आहेत. शिंदेंचे नेतृत्व कणखर सुनील तटकरे म्हणाले की, मित्रपक्षाला काय मिळावे आणि काय मिळू नये याबद्दल गेल्या 3 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी काही भाष्य केले नाही त्यांचे आणि आमचे संबंध अजित पवार असताना ही चांगले होते आणि आताही चांगले आहेत. त्यांचा पक्ष वाढावा यासाठी ते कणखरपणे पाऊले उचलत असतात आणि त्यामध्ये त्यांना यश येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *