![]()
राज्यातील जनतेसमोर पिण्याचे पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्यचार झाल्याचे समोर आले, अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुवव्यस्था राहिलेली नाही. पण आपण आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचे नेतृत्व मिळू दे अशी इच्छा व्यक्त करतात, देवाकडे जाताय तिथे खूर्ची मागत आहेत, महाराष्ट्रासाठी, बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस मागत नाहीत. नालायक लेकाचे लोकं महाराष्ट्र संकटात असताना काय मागतात त्यांना लाज सुद्धा वाटत नाही, असा टोला दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुजराती जोडी देशात कोणाला सत्तेत घ्यायचे आणि कुणाला नाही हे ठरवते. दोन जण देश चालवत आहेत आणि दोन जण देशाची संपत्ती लुटण्याचे काम करत आहेत. आम्हाला देशामध्ये वाढणारी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, लोकशाही टिकेल का नाही, अशा मुद्द्यांची चिंता आहे. कोणाला सत्तेत घेणार हे महत्त्वाचे नाही.
..भेट घेतल्याचा अर्थ पक्षप्रवेश नसतो विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी जर उद्या माझ्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्यांचा असा अर्थ भाजपात जाणार असं नाही. मी जर एकनाथ शिंदेंची भेट घेतली तर त्यांचा अर्थ मी शिवसेनेत जाणार असा काढायची गरज नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांकडे लोकप्रतिनिधींचे कामे असतात त्यांचा असा अर्थ काढायचा नसतो. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे. मग आम्ही काय राज्यपालांना भेटायचे का? विजय वडेट्टीवार म्हणाले की, विकासाच्या कामासंदर्भात सत्ताधाऱ्यांची भेट घ्यावी लागते मतदारसंघातील कामासंदर्भात आम्ही काय राज्यपाल आणि चीफ जस्टीसकडे जावे का? विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतली तर त्याचा दुहेरी अर्थ काढू नये. लॉजिकमागे काही लोकांत अस्वस्थता आहेत. कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, अर्थ खाते कोणाला देणार यापेक्षा राज्यातील शेतकरी आज संकटात आहे यावर चर्चा करणे गरजेचे आहे.
Source link