![]()
गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 19 ते 29 जुलै या कालावधीत मंदिरात पार पडणार असून, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी धार्मिक विधी व पूजा-अर्चा होईल. दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर सायंकाळी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. या दिवशी मंदिरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरास भेट देतील. यामुळे भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आखणी करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, खजिनदार ॲड. सूरज थोरात, विश्वस्त वर्षा थोरवे, डॉ. पराग काळकर, महेंद्रशेठ गाडवे, उत्सव प्रमुख नितीन पंडित तसेच उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज करावे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2026-27 या वर्षासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते.इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 28 जुलै 2026 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.