Headlines

पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू:हडपसर कचरा डेपोत कंत्राटी कामगाराला ट्रकने उडवले, तर पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार ठार




हडपसरमधील काळेपडळ भागात पुणे महापालिकेच्या कचरा डेपोत एका सफाई कामगाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव सुनील हनुमंत गुरव (वय 27, रा. बसवकल्याण, कर्नाटक) आहे. दिनेश श्रीमंत राठोड (वय 36, रा. कलबर्गी, कर्नाटक) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक आणि सुनील गुरव हे दोघेही महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कचरा वाहतुकीचे काम करतात. कचरा घेऊन आलेला ट्रक काळेपडळ येथील कचरा डेपोच्या आवारात आला, तेव्हा सुनील गुरव तिथे काम करत होता. अंधारात कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पोलिसांना माहिती न देताच घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघात करून पळून गेलेल्या ट्रक चालकाचे नाव आता समोर आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार तरुणाचा मृत्यू पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोहेल नूर अन्सारी (वय 21, सध्या रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी बसचालक वैभव चंद्रकांत चौगुले (रा. साधू वासवानी चौक, पुणे स्टेशन) याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेहान इक्राम अन्सारी (वय 19, रा. जनवाडी, मूळ रा. बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रस्त्यावरील मेरिडियन प्लाझाजवळ अपघात झाला. आरोपी त्याच्या ताब्यातील पीएमपी बस भरधाव आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता. बसने फिर्यादींच्या सायकलला धडक दिली. त्यांचा मित्र सोहेल हा बसच्या मागील चाकाखाली सापडला. बसचे चाक त्याच्या पोटावरून आणि पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या दुखापतींमुळे सोहेलचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक एन करांडे तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *