अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबईतील दादर येथील आंदोलनानंतर आज उपराजधानी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येत आहे. नागपू
.
आंदोलनाचे स्वरूप : रामरक्षा पठण आणि जाहीर सभा
राम मंदिराच्या आतमध्ये उद्धव ठाकरे देवी-देवतांची पूजा करून रामरक्षा आणि हनुमान स्तोत्राचे पठण करतील. मंदिर प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिरात कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे पठणानंतर मंदिराबाहेर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या एका भव्य मंचावरून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आणि समर्थकांना संबोधित करतील.
संजय राऊतांकडून पाहणी
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी स्वतः मंदिर परिसर आणि सभास्थळाची पाहणी केली. गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत आणि अंबादास दानवे विदर्भात तळ ठोकून आहेत आणि या कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. रामनगर मंदिर परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या असून, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआऊट्स आणि ‘रामद्रोह, हिंदुद्रोह म्हणजे देशद्रोह’ आशयाचे होर्डिंग्ज लक्ष वेधून घेत आहेत.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते मुंबईहून नागपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, विनायक राऊत, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण आणि अंबादास दानवे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
फडणवीस आणि भागवतांना निमंत्रण देण्यामागची भूमिका
ज्या रामनगरच्या राम मंदिरात हे आंदोलन होत आहे, त्या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजीवन सदस्य आहेत. याशिवाय, सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण देण्याबाबत संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले, “नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून ती हिंदुत्वाची उपराजधानी आहे. आमचे सरसंघचालकांशी मतभेद असू शकतात, पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर राहिला आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा एवढा मोठा कार्यक्रम नागपुरात करत असताना मोहन भागवतांना निमंत्रण देणे हे आमचे कर्तव्य आणि धर्म आहे.”
आंदोलनात अडथळे आणल्याचा आरोप
“राम मंदिराची लूट ही अत्यंत चिंतेची बाब असून, मंदिर वाचवण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन पुकारले आहे. मात्र, या रामरक्षा आंदोलनात काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नागपुरात होणाऱ्या या ‘रामरक्षा आंदोलना’कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातमी वाचा…
जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला करणार हनुमान चालीसा पठण

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा करत त्यांना थेट अयोध्येचे दर्शन आणि हनुमान चालिसा प्रकरणाची आठवण करून दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी