Headlines

विठुरायाच्या भेटीला निघाले 41 वारकरी:मोर्शी आगारातून विशेष बस पंढरपूरकडे रवाना, 29 महिला भाविकांचा समावेश‎




विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल असा एकच गजर, मनात विठुरायाच्या भेटीची आस आणि पंढरपूरच्या दिशेने वेगाने धावणारे मन अशा स्थितीतील मोर्शी येथील ४१ वारकरी एकत्रितपणे पंढरपूरकडे एकाच पंढरपूर वारी स्पेशल या एकाच एसटी बसने रवाना झाले. वारकरी पंढरपूरकडे निघण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी एकाच गावातील वारकरी एकाच एसटीतून पंढरपूरकडे निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ होय. एसटीने ४० किंवा त्यापेक्षा जास्त वारकरी एकत्रितपणे एसटीतून जाणार असतील तर त्यांना पंढरपुरात घेऊन जाण्यासह तेथून परत आणण्यासाठी विशेष बसची सोय केली आहे. मोर्शी तालुक्यातील किन्हाळा या गावातील एकूण ४१ वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. यामध्ये १२ पुरुष आणि २९ महिला भाविकांचा समावेश आहे. बसचे चालक मंगेश वानखडे आणि वाहक किशोर मोहोड यांचा नारळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोर्शी आगाराचे आगार व्यवस्थापक योगेश ठाकरे, आगारातील अधिकारी व कर्मचारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब भाजपाचे शहर प्रमुख राहुल राहुल चौधरी, ब्रम्हानंद देशमुख, नितीन चिखले, अजय आगरकर, मनीष केचे, श्रीकांत सीनकर, अंबादास सीनकर, नितीन पन्नासे, राजू श्रीराव, शांतीदास उमक,महादेव नवघरे, प्रीती देशमुख, मंगला पडोळे, रोशन बुरंगे, भूषण पडोळे, उज्वल निचीत, धीरज निस्वादे आदींचा समावेश होता. वारकऱ्यांना एकत्रित प्रवासाची संधी एकाच गावातील वारकऱ्यांना विशेष एसटीतून एकत्रित प्रवासाची संधी मिळाली असून दोन-चारच्या गटाने वेगवेगळी जाण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे हा प्रवास अगदी स्मरणीय तसेच आपुलकीचा ठरणार आहेत. सर्व वारकरी एसटीत विठुरायाचे नामस्मरण करण्यासोबतच हरिपाठ, नाश्ता, चहा, भोजन एकत्रितपणे घेऊ शकतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *