Headlines

'विश्वगुरू झुरळांना घाबरतात!':दिल्लीतील दडपशाहीवरून सुषमा अंधारेंचा घणाघात, सरकार लोकशाहीचा मुडदा पाडत असल्याची केली टीका




संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. संसद भवनाजवळ पोहोचलेल्या या आंदोलकांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांच्या या दडपशाहीवरून आता राजकीय वातावरणही तापले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, दिल्लीतील आंदोलनाची बातमी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. आंदोलकांचा प्रश्न चर्चेतून सोडवता आला असता. पण प्रश्न चर्चेच्या पातळीवर सोडवण्याऐवजी सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे उचलले त्यातून आंदोलन मोडून काढण्यावर जास्त भर दिल्याचे दिसत आहे. पांढऱ्या चादरी घेऊन सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याकडे पांढऱ्या चादरी कधी वापरल्या जातात? शेवटच्या क्षणी. लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे. लोकशाहीचा मुडदा उचलायचा आहे, अशा पद्धतीने पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या. विश्वगुरु झुरळांना घाबरतात पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, आज सुद्धा पाण्याचे फवारे. लाठीचार्जसाठी सरकार सज्ज आहे. जे लोक पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे असे म्हणतात ते आपल्याच देशातील नागरिकांशी चर्चा करायला घाबरतात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट, पण तुम्ही छत्रच करायला घाबरत आहात. याचा अर्थ विश्वगुरु झुरळांना घाबरतात. हे फार चिंताजनक आहे, या देशात लोकशाही संपलेली आहे. आम्ही अभिजीत दिपकेंच्या संपर्कात दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, आम्ही सगळे सीजेपी सोबत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार संपर्कात आहेत. अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांच्याबरोबरच 18 जणांशी आम्ही संपर्क साधला असून चर्चा केली आहे, अशी माहिती अंधारे यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *