![]()
शास्त्रीय संगीत आणि संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘संतवाणी’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे येथील भरत नाट्य मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात संतांच्या अभंगवाणीला स्वरसाज चढवण्यासाठी चार प्रसिद्ध गायक एकाच मंचावर येणार आहेत. विराज जोशी, पं. उपेंद्र भट, सावनी शेंडे आणि पं. श्रीनिवास जोशी हे कलाकार संतवाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करतील. या गायकांना आनंद टाकळकर (टाळ), पांडुरंग पवार (तबला), गंभीर महाराज (पखवाज) आणि माधव लिमये (हार्मोनियम) हे कलाकार वाद्यसाथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख करणार आहेत. ‘संतवाणी’ कार्यक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या निवडक अभंगांचे सादरीकरण केले जाईल. पुणेकर रसिकांना भक्तिरसात न्हाऊन निघण्याची ही एक अनोखी संधी मिळणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुणे व परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून संतवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात आले आहे. भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये पाच दिवसीय इंडक्शन कार्यक्रम भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये दि.21 ते 25 जुलै 2026 या कालावधीत पाच दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 21 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (आयएएस) उपस्थित राहणार असून पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम,कुलगुरू डॉ. विवेक सावजी हे विशेष अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटचे संचालक डॉ.श्रवण कडवेकर यांनी ही माहिती दिली.
Source link
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 'संतवाणी' कार्यक्रमाचे आयोजन:24 जुलै रोजी भरत नाट्य मंदिरात चार गायक सादर करणार अभंग