सोमवारी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्ष
.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सदाभाऊ खोतांच्या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. , “ज्या नेत्यांनी आयुष्यात स्वतः इतकी वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलने केली, तेच आज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ म्हणत आहेत. सदाभाऊ खोतांकडून अशा चुकीच्या वक्तव्याची अजिबात अपेक्षा नव्हती. एका केंद्रीय शिक्षणमंत्र्याला (धर्मेंद्र प्रधान) खुर्चीवर वाचवण्यासाठी हे सरकार निष्पाप विद्यार्थ्यांची डोकी फोडत आहे. परीक्षेतील घोटाळ्यांविरोधात लाखो तरुण रस्त्यावर उतरले आहेत, ते जर तुम्हाला दहशतवादी दिसत असतील, तर मग या देशातील अर्धी जनताच तुमच्या मते दहशतवादी झाली आहे का? सत्तेच्या मशागतीत तुम्ही इतके मश्गूल झाला आहात की, तुमचे विचार पूर्णपणे लुळे आणि पांगळे झाले आहेत,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
सदाभाऊ खोतांनी विधान मागे घ्यावे – बच्चू कडू
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी महायुतीचे घटक असलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनीही उघडपणे असहमती दर्शवली आहे. ते म्हणाले, “सदाभाऊ खोतांचे विधान फार चुकीचे आहे. आंदोलकांना उठलं-सुठलं अतिरेकी किंवा आंतकवादी ठरवणे फार चुकीचे आहे. आपल्याच देशातील तरुणांना तुम्ही आतंकवादी ठरवत असाल, तर त्याचे देशभरात वाईट परिणाम पडू शकतात. सदाभाऊंनी केलेले वक्तव्य मागे घेतले पाहिजे. आंदोलन मुद्द्यावर होणे फार महत्त्वाचे आहे. राजीनाम्याच्या मुद्द्याऐवजी त्या मागणीला दुसरी बाजू दिली असती, तर त्याला अधिक महत्त्व वाढले असते.”
सदाभाऊ खोतांच्या विधानावर राजू शेट्टींचा घणाघात
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘आतंकवादी’ म्हणणाऱ्या शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. “सदाभाऊ खोतांनी पूर्वी मावळ आंदोलनाच्या वेळी स्वतः केलेली प्रक्षोभक भाषणे एकदा ऐकून पाहावीत आणि मगच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या पोरांवर बोलावे,” असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. तसेच, “नीट (NEET) किंवा टीईटी (TET) परीक्षांचे पेपर फोडणारी मंडळी भाजप व संघाशी संबंधित आहेत,” असा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आंदोलकांना आंतकवादी म्हणता येणार नाही – शंभूराज देसाई
तर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु पोलिसांच्या गाड्या फोडायच्या, तोडायच्या, 5-6 पोलिस अधिकारी जखमी झालेत, असा कायदा हाती घेणे योग्य नाही. मात्र आंदोलकांना आंतकवादी म्हणता येणार नाही. विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा…
इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करतेय:दिल्लीतील आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे. सविस्तर वाचा…