![]()
शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर भर बाजारपेठेत झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत शहराला भयमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईचे
.
बैठकीनंतर शेळके म्हणाले, “यापुढे शिर्डीतील एकाही फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करू दिला जाणार नाही. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी. कारवाईदरम्यान कोणाकडूनही अडथळा निर्माण झाला तर मध्यरात्रीसुद्धा मला कळवा. पुढच्या क्षणी मी स्वतः कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहीन.” शिर्डी शहराची प्रतिमा स्वच्छ आणि सुरक्षित राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नसून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांविरोधातही नगर परिषदेने नियमांनुसार कारवाई सुरू केली आहे. आरोपीच्या घराचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून संबंधितांना आठ दिवसांत जागा रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करून संबंधित बांधकामावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे शिर्डीतील व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. “श्रद्धेच्या नगरीत गुन्हेगारांना थारा नाही,” हा संदेश आता प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, अशी भावना शहरातून व्यक्त होत आहे. शिर्डीची ओळख साईबाबांच्या श्रद्धेची आहे आणि ती कायम राखण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.यावेळी आरोग्य सभापती दिपक गोंदकर,नगरसेवक रविंद्र गोंदकर, सतिश गोंदकर, किरण बो-हाडे,अमित शेळके, साई संस्थान सुरक्षा अधिकारी रोहीदास माळी आदींसहअधिकारी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष यांचा शहरातून रुटमार्च याचवेळी शेळके यांनी सुरक्षा रक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्यासमवेत रूटमार्च काढला. सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्क राहून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी आणि भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शिर्डीची अर्थव्यवस्था पूर्णपणे भाविकांवर अवलंबून असल्याने शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.