Headlines

शेतकरी सुखावले:अमरावती जिल्ह्यात 24 तासांत 11.7 मिमी पाऊस




जिल्ह्याच्या १४ तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी २१ जुलैला सकाळी ८ वा. महसूल विभागाने जिल्ह्याचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ३०.६ मि.मी. पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात नोंदवला गेला. दहा दिवसांच्या उघडीपनंतर सोमवारी सायंकाळपासून झालेल्या पाऊसधारांमुळे शेतकरी सुखावले असून, पिकांनाही जीवदान मिळाले आहे. या पावसाची शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागली होती. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत होते. दरम्यान या पावसाने ते संकट काही अंशी दूर सारले गेले . जिल्ह्याच्या सरासरीमध्येही या पावसाने काहीशी भर टाकली असून पाऊस ६५.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. चांदूर रेल्वे खालोखाल २३.४ मिलिमीटर पाऊस चांदूर रेल्वे उपविभागातील दुसरा तालुका असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यात पडला, २०.४ मिलीमीटर दर्यापूर, १८ मिलिमीटर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नोंदला गेला. अमरावती तालुक्यात १७ मिलिमीटर पावसाची नोंद केल्या गेली. सर्वात कमी ०.९ मिलिमीटर पाऊस अचलपूर तालुक्यात पडला. इतर तालुक्यांची आकडेवारी अशी आहे. धारणी १.२ मिमी, चिखलदरा ५.४ मिमी, भातकुली ६.९ मिमी, तिवसा ५.० मिमी, मोर्शी ६.१ मिमी, वरुड १५.८ मिमी, अंजनगाव १.६ मिमी, चांदूर बाजार १.४ मिलिमीटर मंगळवारी दिवसाही झाला जोरदार पाऊस सोमवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या पाऊसधारा मंगळवारी दिवसा सुरु होत्या. सकाळी ११ वाजतापासून सुरु झालेला पाऊस अधून-मधून बरसत होता. त्यामुळे काही तास उघडीप तर काही तास पाऊस असे वातावरण होते. या वातावरणामुळे नागरिकांना त्यांची कामेही करता आली आणि पावसाचाही आनंद घेता आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *