Headlines

4.65 लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू:पाच महिन्यांनंतर शाळांचा पुरवठा सुरळीत, करार विलंबामुळे शाळांवर उसनवारीची वेळ



मधल्या सुट्टीची घंटा वाजली की खिचडीच्या वासाने भरून जाणारे शाळेचे अंगण यंदा मात्र अनेक दिवस शांतच राहिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३,१६५ शाळांमधील ४ लाख ६५ हजार ८६२ विद्यार्थ्यांचा ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत मिळणारा पोषण आहार

.

फेब्रुवारीत आलेला साठा संपल्यानंतर नवीन पुरवठा वेळेत झाला नाही. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी धान्य पुरवठ्याचा करार होणे अपेक्षित होते, मात्र तो रखडल्याने यंत्रणा विस्कळीत झाली. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी खिचडी बनवणे अशक्य झाले.

जिल्ह्यात एकूण ३,१६५ शाळा असून ४,६५,८६२ लाभार्थी विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी ६०% शाळांमध्ये पुरवठा झाला आहे तर पुढील दोन दिवसांत पुरवठा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी १०० ग्रॅम तांदूळ व २० ग्रॅम डाळ, तर सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ व ३० ग्रॅम डाळ देण्याचे नियोजन आहे. हा आहार विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी तसेच शाळेतील नियमित उपस्थितीसाठी महत्त्वाचा मानला जातो.

लोकसहभागाने भागवली मुलांची भूक धान्य संपल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आहार खंडित होऊ दिला नाही. काही शाळांनी शेजारच्या शाळांकडून धान्य उधार आणले, तर काहींनी गावकऱ्यांच्या व पालकांच्या लोकसहभागातून तांदूळ-डाळ जमा करून खिचडी शिजवली. वाढलेला गॅस व तेलाचा खर्च शिक्षकांनी अक्षरशः पदरमोड व उसनवारी करून भागवला.

६० टक्के शाळांमध्ये पुरवठा सुरू Ãकरार प्रक्रियेला विलंब झाल्याने पुरवठा रखडला होता. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये पुरवठा झाला असून उर्वरित दोन दिवसांत पूर्ण होईल. करार प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न राहणार असून, तांदूळ, डाळ, तेल, मसाले व अन्य आवश्यक साहित्य विद्यार्थी संख्येनुसार वितरित केले जात आहे. – संतोष गोरे, पुरवठा अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *