राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. आज दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवा
.
नेत्यांनी दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा
अजितदादांचा कडक स्वभाव, सकाळी ६ वाजता सुरू होणारी त्यांची कार्यशैली आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना अभिवादन करत आहे. विशेषतः पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री आदिती तटकरे आणि जयंत पाटील यांसारख्या अनेक बड्या नेत्यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कुणी त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाचे कौतुक केले, तर कुणी अनेक दशकांची मैत्री आठवून शोक व्यक्त केला. राजकारणातील या धुरंधर नेत्याला दिग्गज नेत्यांनी वाहिलेली ही भावपूर्ण आदरांजली आणि त्यांच्या भावना…

अजितदादांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिवादन
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना विनम्र अभिवादन केले. “दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन,” अशा शब्दांत फडणवीस यांनी अजितदादांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली.
दादांची जागा कोणीही भरू शकत नाही- एकनाथ शिंदे
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक पोस्ट करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. “दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. त्यांनी पाहिलेल्या सुखी-संपन्न महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बळ मिळो,” अशा शब्दांत शिंदे यांनी अजितदादांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली असून, ‘हा दिवस जयंती म्हणून स्वीकारायला मन तयार नाही’, अशा अत्यंत वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कागदावर आज तुमची जयंती असली तरी आमच्यासाठी तुमचा वाढदिवसच आहे – रोहित पवार
तुमचे कार्यकर्ते म्हणून तुमचा विचारांचा वारसा पुढे चालवू – रुपाली चाकणकर
हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही तयार होत नाही:अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने संपूर्ण राज्यभरात आणि पवार कुटुंबात अत्यंत भावूक वातावरण आहे. राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली असून, ‘हा दिवस जयंती म्हणून स्वीकारायला मन तयार नाही’, अशा अत्यंत वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. सविस्तर वाचा
