Headlines

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात लिहाखेडीतून शेगावकडे दिंडी रवाना:भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त प्रस्थान‎



सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द व लिहाखेडी येथून श्री संत गजानन महाराजांच्या भाविकांची पारंपरिक पायी दिंडी मंगळवारी ‘जय गजानन, गण गण गणात बोते’च्या अखंड जयघोषात श्रीक्षेत्र शेगावकडे रवाना झाली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून गेल्या ३८ वर्षांपासून अखंड

.

दिंडीच्या प्रस्थानापूर्वी गोळेगाव येथील मंदिर परिसरात सरपंच गणेश बनकर, पोलिस पाटील अरुण बनकर, सुधाकर बनकर आणि गणेश गव्हाणे यांच्या हस्ते पूजा, आरती व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, वीणा आणि हरिनामाच्या जयघोषात पालखीने शेगावच्या दिशेने प्रस्थान केले. भाविकांच्या भजनांनी व अभंगांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

या पायी दिंडीत महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात सुनील जयस्वाल, दादाराव बनकर, गणेश बनकर, समाधान वराडे, आकाश बनकर, भाऊसाहेब बनकर, पत्रकार अरविंद मुरकुटे, योगेश बनकर, करण बनकर, मनोज बनकर, योगेश नवल, विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर सोने, पवन बनकर, हरिदास बनकर, कृष्णा बनकर, सुरेश बनकर, रमेश दांडगे, मनोज दांडगे आदींचा समावेश आहे.

प्रस्थानावेळी गावकऱ्यांनी दिंडीचे ठिकठिकाणी जलोषात स्वागत केले. तसेच वारकऱ्यांच्या सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा देत पिण्याचे पाणी, अल्पोपाहार व आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था केली. गावकऱ्यांच्या या सेवाभावामुळे धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. अनेक दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून ही दिंडी शेगाव येथे पोहोचणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *