Headlines

विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही:लाठीचार्जच्या निषेधार्थ मनोज जरांगेंचा सरकारला इशारा




नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर जाणार आहेत. जंतरमंतरवर आंदोलकांना देणार पाठिंबा दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पक्षा’च्या वतीने आणि विद्यार्थ्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र, पोलिसांनी अचानक केलेल्या लाठीचार्जमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. “सरकारचा माज उतरवावा लागेल…” या अमानुष लाठीचार्जवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “आतापर्यंत दिल्लीतील आंदोलन अतिशय शांततेत सुरू होते. परंतु सरकारने अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला लावला. सरकार इतक्या क्रूरपणे वागू शकते, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे.” मुलांचे पाय तुटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, जर हे सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य पाहू शकत नसेल, तर त्यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रात पाय ठेवू न देण्याचा इशारा विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “देशातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हे सरकार जर लोकशाही मार्गाने जगू देणार नसेल, तर अशा सरकारचा माज उतरवणे गरजेचे आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा लोकच या सत्तेची मस्ती उतरवतील,” असा दावा त्यांनी केला. तसेच, विद्यार्थ्यांवर जर यापुढे पुन्हा हल्ला झाला, तर संबंधितांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. हेही वाचा.. जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा लाठीचार्जमुळे घेरले सरकार, संसदेपासून पीएम निवासस्थानापर्यंत निदर्शने:राहुल शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम, पोलिसांनी उचलून नेले दिल्लीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गदारोळ झाला. नीटमधील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून विरोधकांनी सरकारविरोधात आघाडी उघडली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधकांच्या कठोर भूमिकेमुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *