Headlines

दिल्लीतील आंदोलन विरोधक अन् परकीय शक्तींकडून 'स्पॉन्सर':देशात असंतोष पसरवण्यासाठीच आंदोलन, रवींद्र चव्हाण यांचा विरोधकांवर हल्लाबोल




दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. हे आंदोलन उत्स्फूर्त नसून विरोधी पक्ष आणि देशबाहेरील शक्तींकडून प्रायोजित आहे, असा थेट आरोप चव्हाण यांनी केला आहे. नीट पेपरफुटीविरोधात संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर राजकारण तापले आहे. सीजेपी आणि इतर विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन सुरू ठेवले. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पीएम निवासस्थानावर धरणे दिले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी व इतर विरोधी नेत्यांशी चर्चा केली, पण त्यांनी ऐकले नाही. राहुल, प्रियांका आणि अखिलेश यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून दिले. यावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, या आंदोलनात सहभागी होणारा प्रत्येक विरोधी पक्ष स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या विकासाचे सकारात्मक वातावरण खराब करणे आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण करणे, हाच या संपूर्ण प्लॅनमागील मुख्य उद्देश आहे, असा दावाही त्यांनी केला. 21 वर्षीय साक्षी व्हेंटिलेटरवर ही आदिवासी विद्यार्थिनी पालकांसोबत दिल्लीच्या उत्तमनगरमध्ये राहते आणि ती मूळची झारखंडची आहे. ‘चलो संसद’ मार्चदरम्यान पोलिसांच्या कारवाईत जखमी झाल्यानंतर ती दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात व्हेंटिलेटरवर जीवनाची झुंज देत आहे. आंबेडकरांची 23 रोजी बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे हे दिल्लीत जंतर-मंतर येथे सीजेपी आंदोलनात सहभागी झाले. उद्धव रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. सीजेपीचे संस्थापक दिपकेंशी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तर दुसरीकडे, ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांविरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र निषेध केला. या कारवाईविरोधात त्यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. केंद्राच्या हुकूमशाहीविरोधात विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विरोधी पक्ष व सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *