![]()
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वेगाने सुरू आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेत ९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक मृताच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सन्नी माने यांच्या वारसांना १० लाख रुपये मदत मिळाली आहे. त्यांची पत्नी मनीषा सन्नी माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. राहुल गायकवाड यांच्या वारसांनाही १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री राहुल गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २.५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच, वामन कसबे यांच्या कायदेशीर वारस असलेल्या त्यांच्या पत्नी सुमन वामन कसबे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. यापूर्वी अक्षय सावंत यांच्या वारसांनाही १० लाख रुपये मदत देण्यात आली होती. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही नियमानुसार आर्थिक मदतीची रक्कम थेट जमा केली जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येत आहे. बाधित कुटुंबांना या कठीण प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.”
Source link
मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये मदत जमा:सन्नी माने, राहुल गायकवाड, वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना लाभ; इतरांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात