![]()
शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी पहाटे व दिवसभर पावसाची संततधार होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात मान्सूनचा सरासरी पाऊस ४४८.१ इतका कोसळतो. संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या २२ तारखेपर्यंत १७४.१ मिमी प्रत्यक्ष पाऊस पडला. तो मान्सूनच्या एकूण सरासरीच्या ३८.९ टक्के इतका आहे. संततधार पावसामुळे बुधवारी सायंकाळी भिमा नदीत दौंड पुलावरून १२ हजार ७९७ क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून ४ हजार क्युसेक, तर गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ७ हजार ९२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ९. मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात १७.५ मिमी तर सर्वात कमी पाऊस नेवासे तालुक्यात ३.२ मिमी झाला. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १७४.१ मिमी प्रत्यक्ष पाऊस पडला. हे प्रमाण या कालावधीतील सरासरीच्या ९८.१ टक्के आहे. अकोले तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २६७.५ मिमी पाऊस झाला असून, तेथील आजवरच्या सरासरीच्या तो १२४.६ टक्के आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत सर्वात कमी पाऊस राहुरी तालुक्यात ६८.८ मिमी नोंदवला गेला. तो केवळ ४०.३ टक्के आहे. दरम्यान, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खरीपाच्या पेरण्या पूर्ण क्षमेतेने होतील, असा अंदाज आहे. यंदा ५२.८ मिमी अधिक पाऊस, पेरण्या कमी गेल्या वर्षी २२ जुलैअखेर जिल्ह्यात केवळ १२१.३ मिमी पाऊस झाला होता. यंदा याच काळात १७४.१ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच यंदा ५२.८ मिमी अधिक पाऊस झाला आहे. मात्र झालेला पाऊस सर्वत्र सारखा नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यांनी शंभरी ओलांडली होती, तर ४ तालुक्यांत जामखेड, पाथर्डी, नेवासे, श्रीरामपूर या तालुक्यांत १०० मिमी पेक्षा कमी पाऊस होता. यंदा राहुरी वगळता परिस्थिती सुधारली असून १४ पैकी तब्बल १३ तालुक्यांनी १०० मिमीचा टप्पा ओलांडला. गतवर्षी या काळात ६ लाख हेक्टर हून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र जून,जुलैच्या पावसावर ५ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
Source link
मान्सूनचा 38.9% टप्पा पार; पुढील दोन महिने निर्णायक:आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 174.1 मिमी पाऊस, 24 तासांत 9 मिमीची नाेंद