Headlines

Divija Fadnavis Reacts On NEET Exam Controversy; Advises Youth


नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आता संसदेपर्यंत पोहोचली आहे. या लढ्याला सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळत असतानाच, महाराष्

.

शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार

दिविजा फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र, आंदोलकांनी पोलिसांवर किंवा पोलिसांनी आंदोलकांवर कोणत्याही प्रकारची हिंसा करणे चुकीचे असून त्याला परवानगी मिळता कामा नये, असे त्यांनी सांगितले आहे.

राजकीय पक्षांना आंधळा पाठिंबा नको

शैक्षणिक सुधारणांसाठी सुरू असलेल्या या चळवळीला पाठिंबा देण्यास हरकत नाही. मात्र, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विशिष्ट राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या विचारधारेला आंधळेपणाने समर्थन देऊ नका, असे आवाहन दिविजा यांनी केले आहे. या पक्षांचे खरे हेतू आधीच ओळखून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य

लोकशाहीत विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांचे केवळ शत्रू बनून त्यांची बदनामी करण्याऐवजी, देशाचे हित लक्षात घेऊन विकासाच्या दिशेने चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा दिविजा यांनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.

आंदोलन भरकटल्यास सावधगिरी बाळगा

दिविजा म्हणाल्या की, जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च स्थानी आहे, तोपर्यंत या आंदोलनात काहीच गैर नाही. मात्र, जेव्हा हे आंदोलन ‘नीट’ किंवा पेपरफुटीसारख्या मूळ मुद्द्यावरून भरकटून धर्माच्या दिशेने वळते, तेव्हा त्यामागचे उद्देश पूर्णपणे बदलतात. त्यामुळे, कोणत्याही विचारधारेच्या जाळ्यात न अडकता तरुणांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा..

वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा

नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा

जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद

दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.