Headlines

Mumbai Police Drug Threat Video Controversy; Raj Thackeray Slams Officials



तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा प्रकार काँग्रेसने समोर आणला आहे. त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केलाय. मुंबई काँग्रेसनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तरुणांना इकडे

.

एकीकडे नवी दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन करणारे कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध होतोय. त्यातच हा नवा प्रकार समोर आल्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या दडपशाहीविरोधात वातावरण तयार होताना दिसते आहे.

काँग्रेसने समोर आणलेला व्हिडिओ नेमका काय? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड यांनी एका पोलिसाचा तरुणांना धमकी देणारा व्हिडिओ एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट केलाय. त्या व्हिडिओमध्ये एका गाडीत काही तरुण आणि पोलिस बसलेला दिसतो आहे. त्यात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतो. त्यातला पोलिस म्हणतो की, ‘इकडे वापस मिळालास तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल.’ त्याला उत्तर देताना तरुण तरुण ‘शप्पथ. बिल्कुल नाही. बिल्कुल नाही’, असे घाबरून म्हणतो. त्यावर पुन्हा पोलिस ‘मी डायरेक्ट 50 50 ग्रॅम पावडर घालेन खिशात. मग गेलास…तुमच्यामुळे आम्हाला त्रास आहे,’ अशी धमकी देतो.

खाकी वर्दीतील गुंड याचे हे उदाहरण बघा..!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, ‘तरुणाई न्यायासाठी, सत्यासाठी लढतेय. या तरुणाईला पोलीस खिशात ड्रग्स टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. पोलिसांची इतकी क्रूर बुद्धी तर इंग्रजांच्या राज्यातही नव्हती, इतके क्रूर हे पोलीस भाजपाच्या राज्यात झाले आहेत. खरंतर विद्यार्थ्यांच्या खिशात टाकण्यासाठी या पोलिसांकडे ड्रग्स येतात कुठून याची चौकशी झाली पाहिजे..तरुणांना धमकी देऊ नका… महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…पण आता पोलिसांपासूनच सामान्य नागरिकांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे!

ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे!

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडओ पोस्ट करून त्या लिहितात की, ‘Is this the modus operandi of Mumbai Police and NCB? Is this how those infamous NCB cases were filed? Policeman threatens students he will plant powder in their pockets! NEET पेपरफुटीविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावलं जातंय “पुन्हा दिसलास तर खिशात पावडर ठेवून केस टाकेन… माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!” ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे!’

कठोर कारवाईची मागणी

वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, ‘ज्या देशाचा गृहमंत्रीच तडीपार राहिलेला असेल, त्या व्यवस्थेत काही पोलिसही कायद्यापेक्षा दहशतीवर विश्वास ठेवतात, यात आश्चर्य नाही. पण अशा वृत्तीचा हा पोलीस संपूर्ण पोलीस दलावरचा कलंक आहे. या पोलिसाने आजवरच्या आपल्या कार्यकाळात अशा धमक्या देत किती निष्पाप तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवलं, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तात्काळ निलंबन करून त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *