![]()
दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लोकशाही व शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या विद्यार्थी रॅलीवर भाजप सरकारने पोलिस व गुंडांकडून अमानुष मारहाण केली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी (दि.२३) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोयगाव येथे त्या अन्यायाच्या विरोधात व चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे गुरुवारी सोयगाव येथे सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय संघटनांचे व वंचितचे माजी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ मोरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रवींद्र काळे, तालुका अध्यक्ष दीपक देशमुख, कृष्णा पाटील, काँग्रेसचे राजेंद्र काळे, आदिवासी संघटनेचे शेख गुलाब मामू, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुभाष जाधव, महिला तालुका अध्यक्ष सुशीला इंगळे, तालुका अध्यक्ष मुकुंदा वाहुळे, कवी अनिल शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सोयगावचे नायब तहसीलदार संभाजी देशमुख, एपीआय दिनकर गोरे यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे पूर्व तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, पश्चिम तालुका अध्यक्ष गणेश सोनवणे, तालुका समन्वयक मनोहर जगताप, मगरे, भीम आर्मी तालुका अध्यक्ष राजू वानखेडे, शेख बबलू, दीपक नवगीरे, पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव भारत पगारे यांनी केले. आभार वंचितचे सिद्धार्थ मोरे यांनी मानले. बनोटीत बंद पाळून निषेध तालुक्यातील बनोटी येथेही वंचित बहुजन आघाडी,शिवसेना व मित्र पक्ष व व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पाळून दिल्ली येथील जंतर मंतर मैदांवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला.
Source link
दिल्ली घटनेचा सोयगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध:विद्यार्थी आंदोलनातील अमानुष मारहाणीच्या निषेध