Headlines

चांदवडमध्ये भरपावसात आंदोलन:घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी‎




नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. २३) चांदवड येथे प्रमुख विरोधी समविचारी पक्ष, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, आरपीआय, शिवसेना (उबाठा), कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया पँथर सेना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. भर पावसात आंदोलन करत “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने गुरुवारी दिलेल्या चांदवड बंदच्या हाकेला शहरात प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी संतोष केदारे, संजय जाधव, डॉ. आत्माराम कुंभार्डे, विलास भवर, अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *