‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्याम
.
नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पत्रकार परिषदेत ‘नीट’ आंदोलनावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधक केवळ अधिवेशनाचे कामकाज रोखण्यासाठी या प्रश्नाचे राजकारण करत आहेत. “तुमचा हेतू जर हा असेल की या देशात पेपर्स फुटू नयेत, तर ते फुटूच नयेत. पण एखादा पेपर फुटल्यानंतर… म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना! आंबा चोरला तर त्याला समज देणे असते. आणखी काहीतरी चोरले तर त्याची शिक्षा वेगळी ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीला ‘फाशी-फाशी’ असे नसते.”
विरोधकांचा हेतू वेगळाच
“नीटची परीक्षा फुटली, पण ती पुन्हा झाली. त्यात कणभरही गडबड झाली नाही, निकाल लागले आणि आता कॅप राऊंड सुरू होतील. तरीही या विषयावरून राजकारण केले जात आहे. उठसूठ राजकारण करून आपण देशाचे, समाजाचे आणि जगातील आपल्या प्रतिमेचे नुकसान करत आहोत. या आंदोलनाचा विषय वेगळा आणि त्यामागील विरोधकांचा हेतू वेगळाच आहे. अधिवेशनात महत्त्वाची विधेयके येऊ न देणे आणि कामकाज डिस्टर्ब करणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
देश संपवण्याचा विचार चाललाय का?
विरोधकांवर गंभीर आरोप करताना पाटील म्हणाले, “काही मोठे हेतू आहेत जे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. पण अशा लिंक खूप लांबपर्यंत जातात. काय चाललंय? देश संपवण्याचा विचार चाललाय का तुमचा? पण हा देश संपणार नाही. मोगल आणि ब्रिटिश येऊन गेले, तरी देश संपला नाही.” तसेच, पेपर फोडणारे सर्वजण अटकेत असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका
चंद्रकांत पाटील यांच्या ‘आंबा चोरीच्या’ वक्तव्याचा मनसेने तीव्र निषेध केला आहे. मनसेने टीका करताना म्हटले आहे की, “20 विद्यार्थ्यांचा मृत्यू यांना आंबा चोरल्यासारखं वाटतोय?” विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ आणि पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्याची तुलना आंबे चोरीशी करणे अत्यंत संतापजनक असल्याचे मनसेने म्हटले आहे.
हेही वाचा…
संबंधित बातमी वाचा..
राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी