मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ‘सीजेपी’ (CJP) आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसऱ्या
.
चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना जेव्हा महिला पोलीस उठवत होत्या, तेव्हा अनिल देशमुख यांचा हात एका महिला पोलिसाला लागून विनयभंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ…
“स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणाऱ्या संधीसाधू लांडग्यांनो, आता डोळे उघडा आणि नीट बघा..! ज्या मुंबई पोलिसांच्या नावाने कालपर्यंत थयथयाट करत होतात, त्याच मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचा विनयभंग तुमच्याच महाविकास आघाडीचा माजी गृहमंत्री करत आहे. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ताकद असेल तर त्याला आघाडीतून तात्काळ हद्दपार करा!”

दरम्यान, या आरोपांवर अद्याप राष्ट्रवादीकडून अथवा अनिल देशमुखांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या घटनेवरून येणाऱ्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दादरमधील ‘सीजेपी’ आंदोलन: पोलिसांवर विनयभंगाचा आरोप
दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) समर्थनार्थ 23 जुलै रोजी दादरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एक वेगळाच वाद उभा राहिला. साध्या वेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने एका विद्यार्थिनीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओनंतर आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप होत आहेत, त्यांचे नाव दीपक बल्लाळ असून ते शिवाजी पार्क येथे हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
या वाढत्या वादानंतर मुंबई पोलिसांच्या उपायुक्त कार्यालयाने स्पष्टीकरण देत विनयभंगाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोटमधील एक तरुण मुलांना पुन्हा आंदोलनासाठी उकसावत होता. पोलीस हवालदार बल्लाळ त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता, संबंधित तरुणी अटकाव करण्यासाठी मध्ये आली. अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत असताना ही महिला नकळतपणे मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओचे बारकाईने परीक्षण करूनच ही वस्तुस्थिती मांडली आहे.
रोहित पवारांना कानपिचक्या
“एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते,” असे मुंबई पोलिसांनी रोहित पवारांना सुनावले.
रोहित पवारांचे पोलिसांना सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर आमदार रोहित पवार यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पोलिसाने हात बाजूला का केला नाही?”: “पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल, तर तेव्हाच पोलिसाने थांबणे अपेक्षित होते. परंतु, आंदोलक महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही पोलीस कर्मचाऱ्याने हात बाजूला केला नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
महिला पोलीस का नव्हत्या? “दिल्लीत किंवा नागपुरात मुलींना पुरुष पोलिसांकडूनच मारहाण झाली. मुंबईत आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी तुम्ही महिला पोलीस ठेवू शकत नव्हता का? तसेच, हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात का होते, याचे उत्तर जनतेला द्या. पोलिसांच्या वागण्याला पाठीशी घालण्यापेक्षा संबंधितावर कारवाई करावी,” अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…
राज ठाकरेंचा संतप्त सवाल:विद्यार्थ्याला मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते; मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर, आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही?

नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय?

‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी