Headlines

Aditya Thackeray Slams Centre Over NEET Paper Leak; Demands Pradhan Resign


नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट)चे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात

.

“हे व्यासपीठ विद्यार्थ्यांचे आहे”

भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून विद्यार्थ्यांचे असल्याचे स्पष्ट केले. “आम्ही येथे तुमच्यासोबत उभे आहोत, जेणेकरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणी हात लावू शकणार नाही. हे व्यासपीठ आमचं नाही, हे आंदोलनही आमचं नाही. कदाचित तुम्ही आम्हाला मतदानही करत नसाल, पण तो तुमचा लोकशाही अधिकार आहे. मतभेद असू शकतात, मात्र विरोध करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आम्ही नेहमीच मान्य करू,” असे ते म्हणाले.

“धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही”

नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. “धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ही लढाई सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा उल्लेख

आदित्य ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचाही उल्लेख केला. “सोनम वांगचूक यांनी 25 दिवस उपोषण करून विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही. आजही अनेक विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे,” असे ते म्हणाले.

“लाठीमारानंतर मैत्री शक्य आहे का?”

सरकारवर निशाणा साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. “लाठीमार झाल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता का? अश्रुधुराचा सामना केल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र राहू शकता का? पेपरफुटीनंतर आणि संविधानावर अन्याय करणाऱ्यांचे तुम्ही मित्र होऊ शकता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “जेव्हा-जेव्हा सरकार अडचणीत येते, तेव्हा ते धर्म, जात, भाषा यांचे राजकारण पुढे आणते,” असा आरोपही त्यांनी केला.

“ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांची भूमी”

भाषणाच्या शेवटी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचा उल्लेख करत, “ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमी आहे आणि ही मुक्त विचारांच्या लोकांची भूमी आहे. आम्ही कोणाच्याही भीतीपुढे झुकणार नाही,” असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “प्रेमाने संवाद साधाल तर प्रेम मिळेल. मात्र दडपशाही कराल तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. आज आपण सर्वजण तिरंगा हातात घेऊन आलो आहोत. येथे धर्म, जात, भाषा किंवा पक्ष नाही; आपण सर्वप्रथम भारतीय आहोत,” असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एकजुटीचा संदेश दिला. यानंतर राष्ट्रगीताचे गायन करून आंदोलनाची सांगता केली.

हे ही वाचा…

राज ठाकरेंचा संतप्त सवाल:विद्यार्थ्याला मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते; मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर, आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही?

नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

एखाद्याने आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते!:नीट पेपरफुटीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य, मनसेची टीका- 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय?

‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (24 जुलै) एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “एखाद्याने आंबा चोरला, म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही,” असा युक्तिवाद त्यांनी पेपरफुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.