![]()
नोकरीची जबाबदारी, कुटुंबाची धावपळ व बदलत्या जीवनशैलीच्या काळातही श्रद्धेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भक्तीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि माउलीच्या दर्शनाची ओढ मनात साठवत जिल्हा परिषदेचे अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा वारकरी समूह यंदा सलग २७ व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी रवाना झाला. उर्वरित पान ४ आधुनिक जीवनाच्या वेगवान प्रवाहात अनेक परंपरा कालबाह्य होत असताना, अकोल्यातील या अधिकाऱ्यांनी सलग २७ वर्षे वारीची परंपरा अत्यंत निष्ठेने जपली आहे. वारी ही केवळ पायी चालण्याची धार्मिक परंपरा नसून समता, सेवा, संयम, शिस्त, प्रेम आणि अध्यात्माचा जीवनमंत्र आहे. या वारकरी समूहाने ही परंपरा जपत नव्या पिढीसमोर संस्कार व भक्तीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कर्तव्य बजावत असतानाच अध्यात्माची जोड कशी द्यावी, हेच या उपक्रमातून दिसून येत आहे. जपली जातेय परंपरा; नव्या पिढीसाठी आदर्श श्वास असेपर्यंत वारी अशीच सुरू राहणार ^आमच्या जिवात जीव असेपर्यंत पंढरपूरची ही वारी अखंड सुरूच राहील. वारी ही आमच्यासाठी केवळ परंपरा नाही, तर ती आमच्या जीवनाचा श्वास, श्रद्धेचा आधार आणि विठ्ठलाशी जोडणारा आत्मिक धागा आहे. या २७ वर्षांच्या प्रवासात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग आले, मात्र माउलीवरील विश्वास कधीही डळमळला नाही. पुढील पिढीपर्यंत ही भक्तीची परंपरा पोहोचवणे, हाच आमचा संकल्प आहे. -डॉ. उल्हास मोकळकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती.
Source link
पंढरीची वाट:27 वर्षांची वारी; अधिकाऱ्यांची विठ्ठलभक्ती