Headlines

जंतर-मंतरच्या लढ्याला वरुड शहरातून साथ:न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन




दिल्ली येथील जंतर-मंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वरुड शहरात आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. वरुड तालुक्यातील व शहरातील विचारवंत, नैतिकतेवर विश्वास ठेवणारे विद्यार्थी, पालक, देशप्रेमी नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांन ी स्पष्ट इशारा दिला की, “जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या धर्तीवर वरुड शहरातील हे बेमुदत धरणे आंदोलन अखंड सुरू राहील.” या आंदोलनाची सुरुवात वरुड येथील महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले चौकात दिवस-रात्र सुरू राहणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. या आंदोलनात डॉ. प्रवीण चौधरी, सुशील बेले, गिरीश कराळे, सचिन आजीकर, तानाजी नाकात, मनीष धोटे, सतीश सोनुले, राहुल बोडके, मनोज पतंगे, मदन तायवाडे, राजा कुकडे, रवींद्र डोंगरे, शेषराव कडू, विलास पाटील, राजेंद्र बहुरूपी, जयश्री पवार, विष्णू राऊत, दीपक भुयार, महाजनकर, चंद्रशेखर वरुडकर, हर्षल पारडसिंगे, राजेंद्र सोनुले, अमोल भुयार, माणिक कुबडे, जितेश शहा, राहुल फुले, वनराजभाऊ कराडे, सुमित गुज्जर, सुरज, अनुराग घोरमाडे, पांडुरंग भाकरे, भालेराव कडू, समीर पठाण, अफजल काझी, सोयल दिवाण, गोपाल उमेकर, प्रकाश गणोरकर, राजेंद्र सोनवणे, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. तत्काळ राजीनामा द्यावा आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांवर झालेल्या पोलिस लाठीचार्ज तसेच आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *