![]()
दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामाध्यमातून या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ही आशा आपण हे गृहमंत्री असेपर्यंत करू शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह त्यांचे संपूर्ण रॅकेट चक्की पिसिंग करे पर्यंत काँग्रेस याचा पाठपुरावा करणार आहे. हे खरे वाले देवेंद्र फडणवीस म्हणतात तसे नाही, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री हे अमित शहा हे आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे कुणाला नाही हे सर्व ठरवतात. धोरणत्मक निर्णयांसदर्भात सुद्धा त्यांना माहिती द्यावी लागते. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत आहे. हिंदी सक्तीच्या आदेशात तेच स्वप्न होते, मोहित कंबोज यांची संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा त्यासाठी करण्यात आला. प्रधान यांच्यानंतर त्यांच्याइतका पाताळयंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस यांची तिथे निवड होऊ शकते. परीक्षेच्या माध्यमातून मोदी सरकारचा मोठा घोटाळा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पण आता एक देश एक परीक्षा या माध्यमातून मोदी सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. परीक्षेवर संपूर्ण नियंत्रण मिळवले स्वत:च्या पसंतीचे अधिकारी त्यावर नेमले. जे लोकं शासकीय सेवेत नाहीत भारत सरकारशी संबंधित नाही, शिक्षण विभागाशी संबंधित नाही अशा लोकांना तिथे पाठवले आणि परीक्षेवर असे नियंत्रण मिळवले की त्यांना पाहिजे ती ती लोकं त्या त्या सेंटरची लोकं अपेक्षित रित्या पास होतील असे रॅकेट धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून राबवल्या गेले. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला, यामध्ये वर्ग विशेषित लोकं त्यांना तिथे घुसवता आली, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. यंत्रणा पारदर्शक होईपर्यंत थांबणार नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गेल्या 8 वर्षांपासून राहुल गांधी विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहेत. 2021 पासून राहुल गांधी जेन झी सोबत चर्चा करत आहेत. या परीक्षेत पारदर्शकता आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही काँग्रेसची भूमिका होती. केंद्र सरकारचे 5 विभाग आहेत त्यांचे बजेट पालक खर्च करतात त्यांचा एक हिस्सा थेट भाजपला मिळतो. या पैशातून भाजप पक्ष फोडण्याचे आणि आमदार-खासदार विकत घेण्याचे काम करते. एका धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे यंत्रणा दुरुस्त झाली असे नाही. यात घुसवलेली लोकं काढून यंत्रणा पारदर्शक करणे ही भूमिका आमची आहे.
Source link
अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ