![]()
एका मुलाने आमच्या मुलींवर अत्याचार करत त्याचे 150 हून अधिक व्हिडिओ काढले आहेत. हे व्हिडिओ सर्व सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामध्ये एकही व्हिडिओ बुरख्यावाल्याचा नाही त्या आमच्या मुली आहेत, असे माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. एकही मुलगी त्यांची नाही सर्व आमच्या मुली आहेत. प्यारे खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी आज बिल आणत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला सशक्त व्हाव्या म्हणून काम करत आहेत. दुसरीकडे तुम्ही महिलांना उद्ध्वस्त करत आहात. पीडितेची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल त्यांच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. राणा देशाला उद्ध्वस्त करू इच्छिता यावर बोलताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले की, नवनीत राणा या महाराष्ट्राला आणि देशाला उद्ध्वस्त करू इच्छित आहेत. हिंदू मुलांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असून यातून हिंदूंना संकटामध्ये टाकत आहेत. त्यांनी विचार केला पाहिजे. या प्रकरणात कोणत्याही हिंदू मुलींचा समावेश नाही हे मला नागपूरमध्ये समजते पण त्यांना अमरावतीमध्ये बसून समजत नाही. तुम्ही कसे म्हणू शकता की 180 च्या 180 मुली या हिंदू होत्या. त्यामध्ये एकाही मुस्लीम मुलीवर अत्याचार झाला नाही. असे बोलणं महिला नेत्या म्हणून तुम्हाला शोभत नाही. राणांवर कारवाई व्हावी प्यारे खान म्हणाले की, नवनीत राणा यांनी पीडित अल्पवयीन मुलींची माहिती सार्वजनिक केली आहे. कायद्यानुसार पीडितांची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा असून, त्याअंतर्गत राणा यांच्यावर कारवाई व्हावी. या प्रकरणात 180 हिंदू मुलींचे शोषण झाल्याच्या अफवा पसरवून दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला आहे. प्रत्यक्षात या सर्व 8 पीडित मुली मुस्लीम समाजाच्या असून त्यातील चार परतवाडा, तीन अमरावती आणि एक नागपूर येथील आहे. पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी प्यारे खान म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी अफवा पसरवणारी व्यक्ती कोणत्याही पक्षामध्ये काम करत असो किंवा कितीही मोठी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणातील एक आरोपी होता तो आरोपीला रुम मिळवून देत होता. 2 मुलींवर अत्याचार झाला तर 6 मुलांसोबत केवळ फोटो आहेत.
Source link
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण:नवनीत राणांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अफवा पसरवून दंगल घडवण्याचा प्रयत्न?- प्यारे खान