![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला असून ‘तो’ शासन दरबारी प्रलंबित आहे. सध्या महाविद्यालयात २०० जागांवर प्रवेश दिला जात असताना प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवेश क्षमता २५० पर्यंत वाढणार आहे. अद्याप जागावाढीबाबत शासनाचा अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ५० अतिरिक्त जागांवर यंदाच प्रवेश मिळणार की नाही?, याबाबत संभ्रम आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एमबीबीएसच्या जागा वाढविण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक बाबींची पूर्तता करून ५० जागांच्या वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. प्रस्ताव सादर होऊन सुमारे सहा महिने उलटले आहेत. मात्र, प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. एमबीबीएसच्या ५० जागा वाढणे ही विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब असली तरी त्यासोबत प्राध्यापकांची पदे देखील भरणे तितकेच महत्त्वाचे आहे. जागा होतील २५० ‘जीएमसी’मध्ये सध्या दरवर्षी एमबीबीएसच्या २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास आणखी ५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळेल. यामुळे प्रस्तावावर शासन स्तरावर कोणता निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव शासनाकडे पाठवला ^एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सहा महिन्यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. प्रस्तावावर शासनस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, जीएमसी
Source link
‘एमबीबीएस’च्या पन्नास जागांचा प्रस्ताव प्रलंबित:सहा महिन्यांपासून मंजुरीची प्रतीक्षा कायम