![]()
अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची एकूण ५२० पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने ही पदसंख्या जाहीर केली असून, यामध्ये पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील जागांचा समावेश आहे. या ५२० रिक्त पदांपैकी ४६७ जागा मेळघाटमधील ‘पेसा’ (PESA) क्षेत्रासाठी आहेत, ज्या विशेषतः पेसा कायद्यांतर्गत भरल्या जातील. उर्वरित ५३ जागा ‘नॉन-पेसा’ क्षेत्रातील आहेत, ज्यांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. नॉन-पेसा विभागात प्राथमिक शिक्षकांच्या ५० आणि माध्यमिक शिक्षकांच्या केवळ ३ जागा रिक्त आहेत. प्राथमिक विभागातील एकूण ५०६ पदांमध्ये विविध माध्यमांच्या आणि विषयांच्या शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक (सर्व विषय, पेसा क्षेत्र) ३२२, मराठी विज्ञान विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, पेसा क्षेत्र) ८४, मराठी भाषा विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, पेसा क्षेत्र) ३४, उर्दू माध्यमाचे प्राथमिक शिक्षक (सर्व विषय, पेसा क्षेत्र) १०, आणि उर्दू माध्यमाचे प्राथमिक शिक्षक (सर्व विषय, नॉन-पेसा क्षेत्र) ३२ यांचा समावेश आहे. तसेच, नॉन-पेसा क्षेत्रातील मराठी विज्ञान विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८) ३, मराठी भाषा विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८) १३ आणि मराठी सामाजिकशास्त्र विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८) २ पदे रिक्त आहेत. माध्यमिक विभागातील एकूण १४ रिक्त पदांमध्ये प्राथमिक शिक्षक वर्ग १ ते ५ (नॉन-पेसा क्षेत्र, सर्व विषय) १, मराठी भाषा विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, पेसा क्षेत्र) ५, मराठी गणित/विज्ञान विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, पेसा क्षेत्र) ३, मराठी सामाजिकशास्त्र विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, पेसा क्षेत्र) ३, मराठी सामाजिकशास्त्र विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, नॉन-पेसा क्षेत्र) १ आणि मराठी कला/संगीत विषय शिक्षक (इयत्ता ६ ते ८, नॉन-पेसा क्षेत्र) १ यांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत पेसा क्षेत्रातील रिक्त पदांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या संदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
Source link
जिल्हा परिषदेत 520 शिक्षकांची पदे रिक्त:प्राथमिक 506, माध्यमिक 14; पेसा-नॉन पेसा जागा जाहीर