Headlines

30 हजार भाविकांचा एकाच वेळी नवकार महामंत्राचा जाप:आनंदधाममध्ये भक्तीचा महासंगम; ‘समर्पण चातुर्मास’मध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती, देशभरातील हजारो साधकांचा‎



आत्मकल्याण, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेल्या ‘समर्पण चातुर्मास २०२६’मध्ये आनंदधाम परिसरात अभूतपूर्व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पूज्य श्री प्रविणऋषीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या सामूहिक नवकार महामंत्र जापात

.

आनंद तीर्थ समवशरण येथे झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी, पूज्य ज्ञानप्रेमविजयजी, पूज्य आलोकऋषीजी, पूज्य तिर्थेशऋषीजी, महासती पूज्य सत्यप्रभाजी, महासती पूज्य अमितज्योतीजी यांची उपस्थिती होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आयएएस सुधीरकुमार कोचर, चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी सौरभ बोरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पूज्य प्रविणऋषीजी यांनी नवकार महामंत्राचे महत्त्व सांगताना, श्रद्धेने केलेला जाप मनःशांती, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढविणारा असल्याचे स्पष्ट केले. अनुष्ठानानंतर अभिमंत्रित पाण्याचे भाविकांनी प्राशन केले. पालकमंत्री विखे पाटील यांनी चातुर्मास हे त्याग व तपस्येचे पर्व असल्याचे सांगत आचार्यश्रींच्या जन्मभूमी शिराळ चिचोंडीच्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आमदार जगताप यांनी चातुर्मासामुळे नगर शहर भक्तीमय झाल्याचे नमूद केले. सुधीरकुमार कोचर यांनी ‘सेवा, संस्कार, सेतू, संवाद, स्नेह’ या सूत्रांनी परिवारातील एकोपा दृढ होतो, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. आनंदधाम परिसरात सामूहिक नवकार महामंत्र जपात सहभागी झालेले भाविक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *