![]()
नागपूरच्या गौरव खोडतकरने राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडियन अथलेटिक्स सिरिज १३’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तेलंगणातील हनमकोंडा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. गौरवने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. गौरव खोडतकरने १५०० मीटरची शर्यत ३ मिनिटे ४७.९० सेकंदात पूर्ण केली. राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसाठी १५०० मीटरची शर्यत ३ मिनिटे ४८ सेकंदांच्या आत पूर्ण करणे हे महत्त्वपूर्ण मानले जाते. गौरव हा मूळचा नागपूरचा असून, ‘हॅरी एथलेटिक्स क्लब’चा खेळाडू आहे. त्याला प्रशिक्षक प्रफुल्ल खोडतकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वीही गौरवने विविध जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. या यशाने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकण्यास मदत केली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Source link
नागपूरच्या गौरव खोडतकरने 1500 मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले:तेलंगणातील इंडियन अथलेटिक्स सिरिजमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत यश