Headlines

‘दिव्य मराठी’चा ‘मातीचे गणेश’ उपक्रम कौतुकास्पद:सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन; जाणून घ्या बाप्पांचे आगमन!




गणेशोत्सवाचा महान वारसा जगाला देणाऱ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवात गणेशाची देखणी मूर्ती हे भाविकांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर विहिरी, तलाव आणि इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नसल्याने बाप्पाच्या मूर्तींची विटंबनाही होते. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन ‘दैनिक दिव्य मराठी’च्या वतीने ‘मातीचे गणेश, घरातच विसर्जन’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. दिव्य मराठीच्या या स्तुत्य उपक्रमाचे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी मनापासून कौतुक केले आहे. देशभरातील आणि राज्यातील नागरिकांना मातीचेच गणपती बसवण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. पर्यावरण पूरक सण साजरे करा दिव्य मराठीच्या या मोहिमेला पाठिंबा देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “पर्यावरण मंत्री म्हणून मी दरवर्षी पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे आवाहन करते. केवळ आवाहनच नाही तर प्रशासकीय पातळीवर विविध विभागांच्या माध्यमातून आम्ही यासाठी नेहमीच विशेष मेहनत घेत असतो. मात्र, या कार्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. दैनिक भास्कर ग्रुपच्या ‘दिव्य मराठी’ वर्तमानपत्राने सुरू केलेला हा प्रयोग अत्यंत कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. मी दिव्य मराठीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आणि त्यांचे अभिनंदन करते.” केमिकलमुक्त आणि मातीच्या मूर्तींना द्या प्रोत्साहन पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. आगामी गणेशोत्सवात सर्वांनी मातीचेच गणपती बनवावेत किंवा खरेदी करावेत. तसेच जे कारागीर अशा पर्यावरण पूरक मूर्ती बनवतात, त्यांना आपण सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक रंगांचा (केमिकल युक्त कलर) वापर नसलेले गणपती घरात आणावेत आणि त्यांचे विसर्जनही पर्यावरण पूरक पद्धतीनेच व्हावे, जेणेकरून आपल्या जलस्रोतांचे नुकसान होणार नाही.” ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेले ‘मातीचे गणेश, घरातच विसर्जन’ हे अभियान घराघरांत पोहोचणे गरजेचे असून, नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन निसर्गाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यंदा तब्बल ‘3 शुभ योगांच्या’ महासंयोगात बाप्पाचे आगमन; जाणून घ्या स्थापना मुहूर्त अन् विसर्जन तिथी! लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपत आली असून, यंदाचा गणेशोत्सव भाविकांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, यंदा गणेश चतुर्थीला तब्बल तीन अद्भुत ग्रहांचे शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया मूर्ती स्थापना, पूजेचा शुभ मुहूर्त आणि विसर्जन तिथीची संपूर्ण माहिती. गणेशोत्सव 2026: यंदा तब्बल ‘3 शुभ योगांच्या’ महासंयोगात बाप्पाचे आगमन; जाणून घ्या स्थापना मुहूर्त अन् विसर्जन तिथी! लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपत आली असून, यंदाचा गणेशोत्सव भाविकांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, यंदा गणेश चतुर्थीला तब्बल तीन अद्भुत ग्रहांचे शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया मूर्ती स्थापना, पूजेचा शुभ मुहूर्त आणि विसर्जन तिथीची संपूर्ण माहिती. 14 सप्टेंबरला होणार ‘बाप्पा’चे आगमन! वैदिक पंचांगानुसार, यंदा भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7:44 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार चंद्रोदयाची वेळ 14 सप्टेंबरला मिळत असल्याने, संपूर्ण देशभरात सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त (दुपारी 1:31 पर्यंत वेळ) टीप: या विहित वेळेत गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणे शास्त्रानुसार अत्यंत फलदायी ठरेल. रवी, ब्रह्म आणि इंद्र योगाचा त्रिवेणी संगम! 25 सप्टेंबरला होणार ‘अनंत चतुर्दशी’ (गणेश विसर्जन) 10 दिवस भक्तांच्या आदरातिथ्याचा स्वीकार केल्यानंतर, बाप्पाला निरोप देण्याचा भावुक क्षण म्हणजेच अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर रोजी असेल. पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी 24 सप्टेंबर रोजी रात्री 11:18 वाजता सुरू होईल आणि 25 सप्टेंबर रोजी रात्री 11:06 वाजता संपेल. त्यामुळे उदयतिथीच्या नियमानुसार, शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी लाडक्या विग्रहांचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *